Bank Loan:- आपल्यापैकी बरेच जण कार खरेदी किंवा घराची खरेदी करतात तेव्हा बँकेकडून किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्जासाठी अर्ज करतात. तसेच बऱ्याच आपत्कालीन गरजा भागवण्यासाठी अनेक व्यक्ती पर्सनल लोन घ्यायला प्राधान्य देतात. परंतु तुम्ही जर कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतले तर आपल्याला त्या कर्जाची परतफेड करणे गरजेचे असते व त्या परतफेडीवर तुम्ही किती व्याजदराने कर्ज घेतले आहे त्याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो. कारण व्याजदराचा परिणाम हा तुमच्या कर्ज परतफेडीवर व पर्यायाने तुमच्या आर्थिक स्थितीवर होत असतो. या अनुषंगाने तुम्हाला स्वस्त व्याजदरात कर्ज मिळणे गरजेचे असते व याच पद्धतीने तुम्हाला देखील कार किंवा घर खरेदी करायचे असेल व तुम्ही स्वस्त कर्ज देणाऱ्या बँकेच्या शोधात असाल तर या लेखात दिलेली माहिती तुम्हाला फायद्याची ठरणार आहे.
बँक ऑफ बडोदाने केले कर्ज स्वस्त
भारतातील महत्त्वाचे असलेल्या सरकारी बँकांपैकी बँक ऑफ बडोदा एक असून या बँकेने ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून सणासुदीच्या कालावधीपूर्वी ग्राहकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून बँक ऑफ बडोदा कडून आता स्वस्तात कर्ज मिळणार आहे. जर अगोदर बँक ऑफ बडोदा कडून कर्ज घेतले असेल व त्याचे ईएमआय जर तुम्ही अजून भरत असाल तरी देखील तुम्हाला या निर्णयाचा खूप मोठा फायदा होणार आहे. कारण या बँकेने नुकताच एमसीएलआर दरामध्ये मोठी कपात केली आहे. या कपातीमुळे पर्सनल लोन तसेच कार लोन व होम लोन सारखे लोन आता स्वस्त व्हायला मदत झालेली आहे.

विशेष म्हणजे हे दर बँकेने 12 सप्टेंबर पासून लागू केलेले आहेत. बँक ऑफ बडोदाने एमसीएलआर दरामध्ये दहा बेसिस पॉईंटने कपात केलेली आहे व ही कपात रात्रभर आणि तीन महिन्यांच्या एमसीएलआर मध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता हा दर 7.95 टक्क्यांवरून 7.85 टक्क्यांवर आणला गेला आहे. तसेच तीन महिन्यांच्या एमसीएलआर दर देखील आता 8.35 टक्क्यांवरून 8.20 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे या कपातीचा परिणाम ग्राहकांवर होणार असून ज्यांनी अल्पकालावधीसाठी कर्ज घेतले आहे त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. कारण एक महिन्याचा एमसीएलआर 7.95% आहे.
सध्या बँक ऑफ बडोदाचा कर्जाचा दर काय?
सध्या बँक ऑफ बडोदा कडून जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर होम लोनचा व्याजदर हा 7.45% पासून सुरु होतो. तसेच कार लोनचा व्याजदर 8.15% पासून सुरू होतो तर पर्सनल लोनचा व्याजदर 10.40% पासून सुरू होतो.