Bank of Baroda : जर तुमचा सध्या एफडी करण्याचा विचार असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आम्ही आज अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा कमावू शकता. आम्ही ज्या बँकेबद्दल बोलत आहोत, ती म्हणजे बँक ऑफ बडोदा ही बँक सध्या आपल्या ग्राहकांना एफडीवर जबरदस्त व्याजदर ऑफर करत आहे. तसेच जर तुम्हाला अल्प मुदतीची एफडी करायची असेल तर ही बँक तुम्हाला संधी देते आहे.
बँक ऑफ बडोदाने नुकतीच अल्प मुदतीची एफडी सुरू केली आहे. या एफडीमध्ये 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक स्वीकारली जाईल. ही बँकेची सर्वाधिक व्याज देणारी एफडी आहे. माहितीनुसार, या नवीन एफडीमध्ये 15 जानेवारी 2024 पासून गुंतवणूक करता येईल.
बँक ऑफ बडोदाने या एफडीला Bob360 असे नाव दिले आहे. ही 360 दिवसांच्या कालावधीसाठीची FD असेल. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 7.10 टक्के तर ज्येष्ठ गुंतवणूकदारांना 7.60 टक्के व्याज दिले जात आहे.
कोण गुंतवणूक करू शकतो?
बँक ऑफ बडोदाचा कोणताही ग्राहक Bob360 FD मध्ये गुंतवणूक करू शकतो. यामध्ये किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. यानंतर तुम्ही 1 रुपयाच्या पटीत किंवा 2 कोटी पेक्षा कमी रक्कम गुंतवू शकता. यामध्ये ऑटो रिन्यूअल आणि नॉमिनेशन सुविधाही देण्यात आल्या आहेत.
बँक ऑफ बडोदा एफडी दर
बँक ऑफ बडोदा सामान्य नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 4.45 टक्के ते 7.25 टक्के व्याज देत आहे. तुम्हाला सांगतो, बँकेने नुकतेच २९ डिसेंबर रोजी व्याजदर वाढवले आहेत.
-7 दिवसांपासून 14 दिवसांपर्यंत 4.25 टक्के
-15 दिवसांपासून 45 दिवसांपर्यंत 4.5 टक्के
-46 दिवसांपासून 90 दिवसांपर्यंत 5.5 टक्के
-91 दिवसांपासून 180 दिवसांपर्यंत 5.6 टक्के
-181 दिवसांपासून 210 दिवसांपर्यंत 5.75 टक्के
-211 दिवसांपासून 270 दिवसांपर्यंत 6.15 टक्के
-6.25 टक्के 271 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी
-360 दिवस 7.1 टक्के
-399 दिवस 7.15 टक्के
-1 वर्ष ते 2 वर्षे – 6.85 टक्के
-2 वर्षे एक दिवस ते 3 वर्षे -7.25 टक्के
-3 वर्ष ते एक दिवस ते 10 वर्षे – 6.5 टक्के