बँक ऑफ बडोदाचे क्रेडिट कार्ड नाहीतर ‘हे’ एटीएम कार्ड देखील आहे खूपच फायद्याचे! मिळेल वार्षिक 707 रुपये शुल्कात ॲमेझॉन प्राईम मेंबरशिप व अनेक फायदे

दररोज काही कामानिमित्त प्रवास करत असाल आणि तुम्हाला जर बस, हॉटेल आणि फ्लाईट इत्यादीच्या बुकिंगवर जर पैशांची बचत करायची असेल तर अनेक बँकांची कार्ड ही फायद्याचे ठरतात व यामध्ये बँक ऑफ बडोदा चा विचार केला तर या बँकेचे इझी माय ट्रिप डेबिट कार्ड हे दररोज प्रवास करणाऱ्या लोकांसाठी खूपच फायद्याचे असे कार्ड आहे.

Ajay Patil
Published:
bob easy my trip

BOB Easy My Trip Debit Card:- विविध बँकांच्या माध्यमातून आपण एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्डची सुविधा घेत असतो व त्याचा आपल्याला अनेक अर्थाने उपयोग होत असतो. शॉपिंग असो किंवा ऑनलाईन खरेदी तसेच इतर अनेक गोष्टींकरिता आपण क्रेडिट कार्ड किंवा एटीएम कार्डचा वापर करून समोरच्याला पेमेंट करत असतो. तसेच प्रवासामध्ये देखील आपल्याला क्रेडिट कार्ड किंवा एटीएम कार्ड फायद्याचे ठरते.

या दृष्टिकोनातून तुम्ही जर दररोज काही कामानिमित्त प्रवास करत असाल आणि तुम्हाला जर बस, हॉटेल आणि फ्लाईट इत्यादीच्या बुकिंगवर जर पैशांची बचत करायची असेल तर अनेक बँकांची कार्ड ही फायद्याचे ठरतात व यामध्ये बँक ऑफ बडोदा चा विचार केला तर या बँकेचे इझी माय ट्रिप डेबिट कार्ड हे दररोज प्रवास करणाऱ्या लोकांसाठी खूपच फायद्याचे असे कार्ड आहे.

हे ट्रॅव्हल डेबिट कार्ड असून जे प्रवास करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी खास सादर करण्यात आलेले आहे. अलीकडेच बँक ऑफ बडोदाने हे ऑनलाईन ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्म इझी माय ट्रिपच्या सहकार्याने सादर केले असून या डेबिट कार्ड मुळे ग्राहकांना लोकप्रिय ई-कॉमर्स साईटच्या व्हाउचरसह ओटीटी स्ट्रीमिंग प्लेटफॉर्मची वार्षिक सदस्यता फक्त 707 रुपये वार्षिक शुल्कात मिळते.

या डेबिट कार्डचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला ट्रॅव्हल बुकिंग साठी कोणत्याही कमीत कमी ऑर्डर मूल्याची गरज भासत नाही. तसेच काही विशिष्ट किंवा विशेष दिवसांवर सवलती ऐवजी वर्षभर सवलतीचे सुविधा यामध्ये ग्राहकांना मिळते.

काय आहे बँक ऑफ बडोदा इझी माय ट्रिप डेबिट कार्डची खास वैशिष्ट्ये?

1- तुम्हाला जर देशांतर्गत फ्लाईट बुकिंग करायची असेल तर त्यावर तुम्हाला दहा टक्के सूट किंवा कमाल 1000 पर्यंत सूट मिळते.

2- इंटरनॅशनल फ्लाईट बुकिंग करायची असेल तर दहा टक्के सूट किंवा कमाल 5000 पर्यंत सूट मिळते.

3- देशांतर्गत हॉटेल बुकिंग करायचे असेल तर यामध्ये हॉटेल बुकिंग वर 15% सूट किंवा जास्तीत जास्त पाच हजारापर्यंत सूट दिली जाते.

4- आंतरराष्ट्रीय हॉटेल बुकिंग करायचे असेल तर त्यावर 15 टक्क्यांची सूट किंवा कमाल दहा हजारापर्यंत सवलत मिळते.

5- बस बुक करायची असेल तर त्या ठिकाणी दहा टक्क्यांची सूट किंवा कमाल 250 रुपये पर्यंत सवलत मिळते.

6- तसेच देशांतर्गत विमानतळ लाउंज प्रवेश तीन महिन्यात तुम्हाला दोन वेळा मिळतो.

7- आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेळा दरवर्षी मोफत लाउंज प्रवेश मिळतो.

8- अमेझॉन प्राईम किंवा सोनी लिव किंवा Zee5 वार्षिक सदस्यत्व दरवर्षी एक याप्रमाणे मिळते.

9- बिग बास्केट किंवा ब्लिंकिट आणि फ्लिपकार्टचे व्हाउचर प्रत्येक तिमाहीत 250 रुपये सूट मिळते.

10- तसेच प्रत्येक तिमाहीत बुक माय शो द्वारे दोन चित्रपट/ नॉन चित्रपट तिकिटांच्या खरेदीवर दोनशे पन्नास रुपयांची सूट मिळते.

11- गाना+ चे दरवर्षी बारा महिने मोफत सदस्यत्व मिळते.

12- अमेझॉनद्वारे रिचार्ज/ बिल पेमेंटवर 20% सूट, कमाल शंभर रुपये प्रति कार्ड प्रति महिना, किमान ऑर्डर मूल्य 129 ही ऑफर फक्त शुक्रवारी लागू असते.

13- झोमॅटो वर वीस टक्के सूट व कमाल शंभर रुपये प्रति युजर्स प्रति महिना, किमान ऑर्डर मूल्य 129 पर्यंत असते व ही ऑफर फक्त शुक्रवारी लागू असते.

14- स्प्री हॉटेल्स बुकिंग वर 25% पर्यंत सूट मिळते व कमाल सुट ही 5000 पर्यंत आहे.

बँक ऑफ बडोदा इझी माय ट्रिप डेबिट कार्डसाठी किती शुल्क लागेल?
बँक ऑफ बडोदा इझी माय ट्रिप डेबिट कार्ड करीता वार्षिक शुल्क 599+ टॅक्स असे मिळून 707 रुपये लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe