Home Loan घेणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! बँक ऑफ बडोदाकडून ५० लाखाचे कर्ज घ्यायचे असल्यास मासिक पगार किती हवा ? वाचा सविस्तर

Published on -

Bank Of Baroda Home Loan : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. विशेषता ज्यांना Home Loan घ्यायचे असेल त्यांच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे.

कारण की आज आपण बँक ऑफ बडोदा च्या गृह कर्जाबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. खरंतर अलीकडे घर घेणे फारच महाग झाले आहे. घरांच्या वाढत्या किमती पाहता आता सर्वसामान्य जनता गृहकर्जाकडे वळाली आहे.

दरम्यान जर तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घरासाठी गृह कर्ज घ्यायचे असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण बँक ऑफ बडोदा कडून ५० लाख रुपयांचे होम लोन घ्यायचे असल्यास मासिक पगार किती लागतो? तसेच या कर्जासाठी किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार याच कॅल्क्युलेशन येथे समजून घेणार आहोत.

रेपो रेट कपातीचा फायदा 

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या वर्षभरात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. मागील वर्षात आरबीआयकडून रेपो रेटमध्ये जवळपास १.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली.

दरम्यान रेपो रेटमध्ये झालेल्या कपातीचा परिणाम म्हणून देशातील कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरबीआयने रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर आणला आहे. आता त्याचा थेट फायदा होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना सुद्धा झाला आहे. कारण Home Loan चे व्याजदर पण कमी झाले आहेत.

आरबीआयच्या निर्णयानंतर, देशातील बहुतांश बँकांनी होम लोनचे व्याजदर कमी केले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने सुद्धा होम लोनचे व्याजदर घटवले आहे. ही बँक सध्या फक्त ७.२० टक्क्यांच्या सुरुवातीच्या दराने होम लोन ऑफर करत आहे.

यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घर खरेदी करणे अधिक सोपे झाले आहे. दरम्यान आज आपण बँक ऑफ बडोदाकडून ५० लाख रुपयांचे होम लोन घ्यायचे असल्यास तुमचा मासिक पगार किती असावा आणि त्यासाठी किती ईएमआय भरावी लागेल, याबाबत माहिती पाहणार आहोत.

महिन्याचा पगार किती असायला हवा? 

बँक ऑफ बडोदाच्या ७.२० टक्के किमान व्याजदरानुसार जर तुम्ही ३० वर्षांच्या कालावधीसाठी ५० लाख रुपयांचे होम लोन घेतले, तर तुमचा मासिक पगार किमान ६८,००० रुपये असणे आवश्यक आहे.

या कालावधीत तुमचा दरमहा ईएमआय सुमारे ३४,००० रुपये येतो. समजा तुम्ही २५ वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज घेतले, तर मासिक पगार सुमारे ७२,००० रुपये अपेक्षित आहे आणि त्यासाठी दरमहा सुमारे ३६,००० रुपयांची ईएमआय भरावा लागणार आहे.

तर २० वर्षांच्या कालावधीसाठी ५० लाखांचे होम लोन घ्यायचे असल्यास, तुमचा मासिक पगार किमान ७९,००० रुपये असणे गरजेचे असून, त्यासाठी सुमारे ३९,५०० रुपयांची ईएमआय येते. पण अर्जदारावर आधीपासून कोणतेही अन्य कर्ज नसावे. नाहीतर एवढे कर्ज मंजूर होणार नाही.

याशिवाय, कोणत्याही बँकेकडून कर्ज मंजूर होण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे अत्यंत आवश्यक आहे. कमी क्रेडिट स्कोअर असल्यास बँक कर्ज नाकारू शकते किंवा जास्त व्याजदर आकारू शकते. त्यामुळे होम लोन घेण्याआधी आपली आर्थिक स्थिती आणि क्रेडिट हिस्ट्री तपासणे महत्त्वाचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe