Saving Account : सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने महिलांसाठी खास योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना लाखो रुपयांचा विमा मिळत आहे, तसेच इतरही अनेक फायदे मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत क्रेडिट कार्ड पासून ते लॉकर सुविधेपर्यंत आकर्षक लाभ मिळणार आहे. बँकेने सुरु केलेल्या या योजनेचे ध्येय महिलांची सुरक्षा हेच आहे. कोणत्या बँकेने ही योजना आणली आहे, तसेच याचे काय-काय फायदे आहेत, सविस्तर जाणून घेऊया.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक, बँक ऑफ इंडियाने महिलांसाठी ही खास योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 100 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा तसेच इतर अनेकही मिळणार आहेत. बँक ऑफ इंडियाने (बँक ऑफ इंडिया बचत खाते) ही विशेष योजना महिलांची सुरक्षा लक्षात घेऊन आणली आहे. बँक ऑफ इंडियाच्या या विशेष योजनेचे नाव नारी शक्ती बचत खाते असे आहे. हे बचत खाते १८ वर्षांवरील महिलांसाठी तयार करण्यात आले आहे.
बँक ऑफ इंडियाच्या या विशेष योजनेअंतर्गत महिला खातेदारांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे हे मुख्य ध्येय आहे. नारी शक्ती बचत खात्यात खाते ठेवणाऱ्या महिलांना वेलनेस उत्पादने आणि आरोग्य विम्यावर चांगली सवलत दिली जाईल.
यासोबतच खातेदारांना डायमंड एसबी आणि गोल्ड खातेधारकांना सवलतीसह लॉकरची सुविधाही दिली जाईल. याशिवाय प्लॅटनियम खाते असलेल्या महिलांना अनेक मोफत सुविधाही दिल्या जाणार आहेत. महिलांना किरकोळ कर्जावरही सवलत मिळेल.
प्रक्रिया शुल्कावर सूट
नारी शक्ती खातेधारकांना किरकोळ कर्ज प्रक्रिया शुल्कातही सूट मिळेल. यासोबतच त्यांना मोफत क्रेडिट कार्ड सुविधेचाही लाभ दिला जाणार आहे.
POS वर उच्च वापर मर्यादा
महिला खातेधारकांना POS व्यवहारांवर 5 लाख रुपयांपर्यंतच्या उच्च वापर मर्यादेचा लाभ मिळेल. यामुळे त्यांना मोठी खरेदी सहज करता येईल.
क्रेडिक कार्ड
नारी शक्ती बचत खाते असलेल्या महिला मोफत क्रेडिट कार्डचा देखील आनंद घेऊ शकतात.
खाते कसे उघडू शकतो?
बँक ऑफ इंडियाच्या नारी शक्ती बचत खात्याअंतर्गत खाते उघडू इच्छिणाऱ्या कोणत्याही महिला बँकेच्या देशभरातील कोणत्याही शाखेत जाऊन त्यांचे बचत खाते उघडू शकतात. या योजनेसाठी महिलाही घरी बसून डिजिटल पद्धतीने अर्ज करू शकतात.
नारी शक्ती बचत खाते हे केवळ नियमित बचत खाते नाही तर हे एक आर्थिक साधन आहे, जे काम करणाऱ्या महिलांना सक्षम करण्यासाठी बनवले गेले आहे. हे त्यांना स्वावलंबी बनण्याची आणि आर्थिक स्वातंत्र्य उपभोगण्याची संधी देतं.