Bank Rule: ग्राहकाचा मृत्यू झाला तर बँकेच्या खात्यातील पैशांचे काय? आला रिझर्व बँकेचा नवा नियम

Published on -

Bank Rule:- आजकाल प्रत्येकाचे बँकेत खाते असते व जास्तीत जास्त लोकांकडून बँकेच्या बचत खात्यांमध्ये पैसे ठेवले जातात. परंतु काही वेळा दुर्दैवाने बँकेचा जो काही ग्राहक असतो किंवा खातेदार असतो त्याचा मृत्यू होतो व त्यानंतर प्रश्न उरतो मग त्या व्यक्तीच्या नावे बँकेत असलेल्या पैशांची नेमके काय होते? ते पैसे बुडीत होतात की कुटुंबातील सदस्यांना मिळतात? याबद्दलची माहिती बऱ्याच जणांना अजूनपर्यंत नाही. त्यामुळे आपण या लेखात यासंबंधीचे रिझर्व बँकेचा जो काही नवीन नियम आलेला आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती बघू.

रिझर्व बँकेचा नवीन नियम काय?

बऱ्याचदा व्यक्तीचे बँकेत खाते असते व त्या व्यक्तीचा म्हणजेच खातेधारकाचा दुर्दैवाने मृत्यू होतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या खात्यातील पैशांचे काय? हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. या संबंधित रिझर्व बँक ऑफ ऑफ इंडियाने एक नवीन नियम लागू केलेला आहे व तो 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे.

यामध्ये बँकेच्या ग्राहकाचा मृत्यू झाला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी बँकेकडून पैसे किंवा लॉकरच्या वस्तूंचा दावा केला तर बँकेला सर्व कागदपत्र मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे राहणार आहे.

या प्रक्रियेमध्ये जर विलंब केला तर बँकेला आता मोठा दंड भरावा लागणार असून हा रिझर्व बँकेचा नवीन नियम 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना बँकेकडून पैसे,लॉकरच्या वस्तू मिळवण्यासाठी दीर्घ प्रक्रिया आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कठोर धोरणामुळे बँकांना या संबंधित प्रकरणांमध्ये उशीर करता येणार नाही. त्यामुळे खातेदाराच्या कुटुंबांना फायदा होणार आहे.

बँकेला होईल दंड?

जर ठेवीमध्ये विलंब झाला तर बँकेला चार टक्के दराने व्याज द्यावे लागेल. दुसरे महत्त्वाचे म्हणजे संबंधित खातेदाराचे लॉकर असेल व ते उघडण्यास विलंब झाला तर बँकेला लॉकरधारकाच्या नामांकित व्यक्तीला दररोज पाच हजार रुपये दंड भरावा लागेल.

तसेच रिझर्व बँकेने लॉकर संबंधीचे नियम देखील बदलले असून यामध्ये आता नॉमिनेटेड म्हणजेच नामनिर्देशीत किंवा संयुक्त धारकाला लॉकरसाठी तत्काळ प्रवेश मिळेल. परंतु अशी कोणतीही व्यक्ती नसेल तर कायदेशीर वारसांना कागदपत्रे पाहून प्रवेश मिळेल.लॉकर बँक अधिकारी आणि साक्षीदारांसमोर उघडले जाईल आणि त्याची माहिती आता नोंदवली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe