Banking News: तुमचेही जनधन खाते आहे का? तर ही बातमी लगेच वाचा… नाहीतर खाते होईल बंद

Published on -

Banking News:- प्रधानमंत्री जनधन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना होती व ही योजना सुरू होऊन जवळपास दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत. आपल्याला माहित आहे की या योजनेच्या माध्यमातून भारतीय नागरिकांचे बँकेमध्ये मोफत खाते उघडण्यात आले व त्यानंतर मात्र सर्वसामान्य आणि तळागाळातील लोकांचा बँकिंग क्षेत्राशी अगदी जवळचा संबंध आला व हे लोक बँकेशी जोडले गेले. तसेच या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत करायला देखील लोकांनी सुरुवात केली. अशाप्रकारे देशातील कोट्यावधी नागरिकांचे जनधन खाते आहे व तुमचे देखील बँकेत जनधन खाते असेल तर रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या नियमानुसार ई केवायसी करणे गरजेचे आहे. त्यासंबंधीची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.

जनधन खातेधारकांना करावी लागणार केवायसी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रधानमंत्री जनधन योजनेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियम बघितले तर त्यानुसार बँकेत खाते उघडल्यानंतर प्रत्येक वर्षाला केवायसी करणे अनिवार्य असते. या अनुषंगाने तुमचे देखील कुठल्याही बँकेमध्ये जनधन खाते असेल तर ताबडतोब केवायसी करून घेणे गरजेचे आहे व महत्त्वाचे म्हणजे यासाठीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत केवायसी केली नाही तर तुमचे जनधन खाते बँक बंद करू शकते व त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे सरकारी अनुदान मिळण्यास अडचणी येऊ शकतात. या योजनेअंतर्गत 2014-2015 मध्ये ज्या व्यक्तींनी खाते उघडलेले असतील अशा खात्यांसाठी केवायसीची दहा वर्षे वैधता असल्याने यांना पुन्हा केवायसी करावी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे बँक खाते सुरू ठेवण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे. याकरिता तुम्हाला फक्त बँकेला तुमचा सध्याचा पत्ता तसेच नाव आणि अपडेट केलेला फोटो यासारखी अपडेटेड माहिती प्रदान करता येते. केवायसी केल्यामुळे फसवणूक रोखण्यास मदत मिळते व बँकिंग सेवांचे सुरळीत कामकाज निश्चित करण्यास मदत होते. याकरिता देशभरातील सरकारी बँका एक जुलै ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये विविध ग्रामपंचायतीमध्ये शिबिरे आयोजित करत आहेत व या अंतर्गत घरोघरी केवायसी आयोजित केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe