Banking News : देशातील मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यवर्ती बँकेने देशातील खाजगी क्षेत्रातील दोन बड्या बँकांवर मोठी कारवाई केली आहे.
खरंतर, गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि देशातील अनेक सहकारी बँकांवर कठोर कारवाई करत त्यांचे लायसन रद्द केले आहे. तसेच काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय देखील आरबीआयने घेतला आहे.
यामुळे बँकिंग सेक्टर मध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. असे असतानाच आता आरबीआयने देशातील एचडीएफसी आणि ॲक्सिस या दोन खाजगी क्षेत्रातील बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
यामुळे ग्राहकांमध्ये थोडेसे भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत, आता आपण एचडीएफसी आणि ॲक्सिस बँक वर आरबीआय ने किती दंड ठोठावला आहे ? या कारवाईचा ग्राहकांवर काय परिणाम होणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या बँकेकडून किती दंड आकारणार ?
ऍक्सीस बँक : ठेवीवरील व्याज दर, केवायसी आणि कृषी कर्ज प्रवाह संबंधित काही सूचनांचे पालन केले नाही म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडियाने ॲक्सिस बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे. ॲक्सिस बँकेला तब्बल 1.91 कोटी रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे.
HDFC बँक : ठेवीवरील व्याजदर, बँकांचे रिकव्हरी एजंट आणि बँकांमधील ग्राहक सेवा यावरील काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल HDFC बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याबाबतच्या निवेदनात आरबीआयने एचडीएफसी बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती यावेळी दिली आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होणार?
ऍक्सीस आणि एचडीएफसी बँकेवर करण्यात आलेल्या या दंडात्मक कारवाईमुळे सदर बँकेच्या ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही. ही दंडात्मक कारवाई बँकेवर करण्यात आली असून ग्राहकांकडून एकही रुपया वसूल केला जाणार नाही.
बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर परिणाम होणार नाही. बँकेचे व्यवहार आधी जसे सुरू होते तसेच पुढेही सुरळीत सुरू राहणार आहेत.