Bank Account मध्ये यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर इन्कम टॅक्स विभाग तुमच्यावर कारवाई करणार ! आयकर विभागाचे नियम काय सांगतात

सेविंग अकाउंटमध्ये एका दिवसात एक लाख रुपये जमा करता येतात. पण जर तुम्ही नियमित खात्यात पैसे जमा करत नसाल तर तुम्हाला अडीच लाख रुपये जमा करता येणार आहे. तसेच एका आर्थिक वर्षांत म्हणजेच मार्च ते मार्च या कालावधीत 10 लाख रुपये जमा करता येतात.

Tejas B Shelar
Published:
Banking News

Banking News : मंडळी जर तुमचेही बँकेत अकाउंट असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर बँकेत विविध प्रकारचे अकाउंट असतात. जसे की करंट अकाउंट, सेविंग अकाउंट हे बँक अकाउंट चे प्रकार आहेत. जे व्यावसायिक लोक असतात त्यांचे नियमित बँकेत व्यवहार होत असतात.

यामुळे व्यावसायिक लोक करंट अकाउंट ओपन करत असतात. ज्या लोकांचे पैशांचे व्यवहार अधिक असतात असे लोक करंट अकाउंट ओपन करतात. तसेच सर्वसामान्य लोक सेविंग अकाउंट ओपन करत असतात.

मात्र सेविंग अकाउंट मध्ये पैसे जमा करण्याबाबत आणि पैसे काढण्याबाबतचे काही नियम असतात. अशा परिस्थितीत, आज आपण सेविंग अकाउंट मध्ये पैसे जमा करण्याबाबत नेमके काय नियम आहेत याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय आहेत नियम?

खरे तर रिझर्व बँक ऑफ इंडियाने तुमच्या सेविंग अकाउंट मध्ये किती रक्कम असावी या संदर्भात कोणतेच नियम तयार केलेले नाहीत. मात्र पैसे जमा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

कारण की तुमच्या बचत खात्यांवर आयकर विभागाची करडी नजर असते. जर तुमच्या बचत खात्यांमध्ये काही गैरप्रकार होत असेल तर आयकर विभागाकडून लगेचच अशा खातेधारकांवर कारवाई केली जाते.

पैशांचे गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी आयकर विभागाचे काही नियम आहेत. हेच नियम आता आपण समजून घेणार आहोत. आयकर विभागाच्या नियमानुसार, 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोकड रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे.

सेविंग अकाउंटमध्ये एका दिवसात एक लाख रुपये जमा करता येतात. पण जर तुम्ही नियमित खात्यात पैसे जमा करत नसाल तर तुम्हाला अडीच लाख रुपये जमा करता येणार आहे. तसेच एका आर्थिक वर्षांत म्हणजेच मार्च ते मार्च या कालावधीत 10 लाख रुपये जमा करता येतात.

जे खातेधारक आपल्या सेविंग अकाउंट मध्ये एका आर्थिक वर्षात दहा लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा करतात अशा खातेधारकाची माहिती सदर बँकेच्या माध्यमातून आयकर विभागाकडे वर्ग केली जाते.

मग आयकर विभाग सदर व्यक्तीकडून उत्पन्नाचे स्रोत मागते. जर उत्पन्नाचे स्रोत सादर करता आले नाहीत तर अशा व्यक्ती विरोधात आयकर विभागाकडून कारवाई केली जाते. अशा व्यक्तीकडून आयकर विभाग दंड आकारते.

किती दंड भरावा लागतो

आयकर विभागाच्या नियमानुसार, जर एखादा व्यक्ती उत्पन्नाचा स्रोत देण्यासं असमर्थ ठरला तर त्याला जमा रक्कमेवर 60 टक्के कर, 25 टक्के सरचार्ज आणि 4 टक्के सेस लागतो. एकंदरीत तुम्ही बचत खात्यात 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकत नाहीत. पण जर तुमच्याकडे उत्पनाने स्त्रोत असतील तर घाबरण्याचे काहीच कारण नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe