PPF, NPS And SSY Alert : जर तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल पेन्शन सिस्टम आणि सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. जर तुम्ही या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला हे काम करणे महत्वाचे आहे, अन्यथा तुमचे खाते बंद होऊ शकते किंवा तुम्हाला दंड बसू शकतो.
या योजनांमधील गुंतवणूकदारांना ३१ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. अन्यथा गुंतवणूकदारांना मोठ्या अडचणींना समोरे जावे लागेल, कोणते आहे ते काम आणि ते काम पूर्ण न केल्यास तुम्हाला कसे नुकसान होईल जाणून घ्या.
केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या लहान बचत योजना गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि उत्तम पर्याय मानल्या जातात. यावरील परतावाही बऱ्यापैकी मिळतो. आणि म्हणूनच लाखो भारतीय या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. अशातच तुम्ही PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करत असाल तर ३१ मार्चपर्यंत हे काम पूर्ण गरजेचे आहे.
नियमांनुसार, PPF, NPS आणि सुकन्या समृद्धी योजनेमध्ये, प्रत्येक आर्थिक वर्षात खात्यात किमान रक्कम जमा करावी लागते. असे न केल्यास गुंतवणूकदारांना दंड भरावा लागतो. असे केले नाही तर त्यांना कर सवलतीपासून वंचित ठेवले जाईल. जर तुम्ही या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर हे काम लवकरात लवकर ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा. अन्यथा तुमचे खाते बंद केले जाऊ शकते किंवा तुम्हाला तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो.
किती दंड भरावा लागेल?
-पीएफसाठी किमान ठेव रक्कम वार्षिक 500 रुपये आहे. वेळेवर रक्कम जमा न केल्यास खाते गोठवले जाते. आणि पुन्हा खाते सुरु करण्यासाठी 50 रुपये दंड द्यावा लागतो.
-सरकार विशेषत: मुलींसाठी समृद्धी योजना राबवते. तुम्हीही तुमच्या मुलीच्या नावाने खाते उघडले असेल, तर लवकरात लवकर किमान रक्कम भरा. यामध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 250 रुपयांची गुंतवणूक करावी लागते. अन्यथा खाते “डीफॉल्ट खाते” म्हणून घोषित केले जाऊ शकते. परंतु तुम्ही 50 रुपये दंड भरून ते पुन्हा सक्रिय करू शकता.
-NPS साठी, वार्षिक 1000 रुपये भरावे लागतात. खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी, गुंतवणूकदारांना किमान 500 रुपये दंड भरावा लागेल.