भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा शेअर करणार मालामाल! प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मने दिली भन्नाट टार्गेट प्राईस

तुम्ही देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल व तुम्हाला देखील चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करायचे असतील तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकतात. कारण आगामी कालावधीमध्ये या कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये तेजीने वाढ होईल असे संकेत प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी दिलेले आहेत.

Published on -

BEL Share Price:- तुम्ही देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल व तुम्हाला देखील चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करायचे असतील तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकतात. कारण आगामी कालावधीमध्ये या कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये तेजीने वाढ होईल असे संकेत प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी दिलेले आहेत.

त्यांच्या मते हा शेअर सध्याच्या पातळीपासून तब्बल 27.5 टक्क्यांनी वाढेल अशी शक्यता आहे व इतकेच नाही तर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने या शेअरकरिता बाय कॉल दिला आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी कुठल्या क्षेत्रात कार्यरत आहे?
भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी ही डिफेन्स आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील एक प्रसिद्ध व आघाडीची कंपनी आहे. डिफेन्स क्षेत्रामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा एकूण 60 टक्के बाजार हिस्सा असून संरक्षण बाजारपेठेमध्ये आपले उत्पन्न सातत्याने वाढवण्यामध्ये या कंपनीने काम केलेले आहे.

जर आपण दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी बघितली तर त्यानुसार भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने 250 अब्ज रुपयांची वर्क ऑर्डरचे टार्गेट ठेवले होते व त्यामध्ये शंभर अब्ज रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी पूर्ण केलेले आहेत. या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीपर्यंत ही कंपनी 150 अब्ज रुपयांचे उर्वरित कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करेल असा अंदाज आहे.

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने जारी केला रिपोर्ट
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मच्या माध्यमातून एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे व त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे की, येणाऱ्या एक ते तीन वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला अनेक मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता असून ऑर्डर बुक अजून मजबूत होऊन कंपनीला याचा खूप मोठा फायदा होण्याची शक्यता आहे

व त्यामुळे येणाऱ्या काळात या कंपनीचा बाजारातील एकूण हिश्यात देखील वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतकेच नाही तर संरक्षण क्षेत्राच्या वाढीपेक्षा देखील भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी जास्त वेगाने वाढेल असे देखील रिपोर्टमध्ये मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!