Best Stock For Long Term : तुमचा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार असेल, किंवा तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर जास्त परतावा हवा असेल तर आज तुमच्यासाठी उत्तम स्टॉक घेऊन आलो आहोत. जिथे गुंतवणूक करून तुम्ही नक्कीच चांगला परतावा कमावू शकता.
भारतीय शेअर बाजार सोमवारी घसरणीसह उघडला आणि दिवसभर खालीच राहिला, तर याआधी शुक्रवारी भारतीय शेअर बाजार मजबूतीसह बंद झाला होता. सोमवारीही बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज होता. पण इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे बाजारातील वातावरण बिघडले.

सोमवारी व्यवहार संपल्यावर सेन्सेक्स 0.73% किंवा 483.24 अंकांनी घसरला आणि 65512 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 0.72 टक्क्यांनी म्हणजेच 141.15 अंकांनी घसरून 19512 अंकांवर बंद झाला. बाजारातील घसरणीमुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर धारकांना चांगलाच फटका बसला. दरम्यान, या काळात काही मूलभूत मजबूत शेअर्सही घसरले. पण असे काही शेअर आहेत जे बाजारातील घसरणीनंतरही चांगला परतावा देत आहेत. आम्ही ज्या शेअरबद्दल सांगणार आहोत, त्यांच्याकडून दीर्घकाळात चांगल्या परताव्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
आज आम्ही तुमच्यासाठी असे तीन स्टॉक्स घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे. रुद्र शेअर्स स्टॉक्स ब्रोकर्स लिमिटेडचे एमडी सुनील बन्सल यांनी दीर्घ मुदतीसाठी तीन शेअर्सची नावे सुचवली आहेत.
IRFC लिमिटेड
पहिला स्टॉक IRFC लिमिटेड आहे. या शेअरमध्ये सोमवारी ५ टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. सध्या हा शेअर ७१ रुपयांवर आहे. या शेअरने एका वर्षात 232 टक्के उत्कृष्ट परतावा दिला आहे. एका महिन्यात स्टॉक 16.05 टक्क्यांनी घसरला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 92.35 रुपये आहे. असे असूनही हा शेअर दीर्घकाळात चांगली कमाई करू शकतो.
PNB चे शेअर्स
पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स सोमवारी 4.69% घसरले. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 83.50 रुपये आहे, सध्या शेअरची किंमत 73.15 रुपये आहे. पण हा शेअर दीर्घ मुदतीत चांगली कमाई करून देऊ शकतो अशी अपेक्षा आहे.
NMDC चे शेअर्स
NMDC चे शेअर्स सध्या 142.75 रुपयांवर उपलब्ध आहेत, तज्ञांच्या मते काही वर्षात हा शेअर गुंतवणूकदारांना मोठी कमाई करू शकतो. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 154.25 रुपये आहे आणि सोमवारी या शेअरमध्ये 2 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.