Fixed Deposit : अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेवींचे व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे. असे असूनही अशा अनेक लघु वित्त बँका आहेत ज्या एफडीवर 9.5 टक्के इतका उच्च व्याजदर ग्राहकांना ऑफर करत आहेत. बँका ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर देत आहेत. अशातच तुम्हीही सध्या तुमच्या एफडीवर चांगला परतावा मिळवू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.
सर्वाधिक व्याजदर ऑफर करणाऱ्या बँका :-

जना स्मॉल फायनान्स बँक व्याजदर
जना स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 3.50 ते 9 टक्के व्याजदर देत आहे. जना स्मॉल फायनान्स बँक दोन वर्षे ते तीन वर्षांच्या दरम्यानच्या मुदतीच्या FD वर 9 टक्के पर्यंत व्याज देत आहे. तर एक ते दोन वर्षांच्या दरम्यान परिपक्व होणाऱ्या FD वर 8.75 टक्के व्याज देत आहे. हा व्याजदर 15 ऑगस्ट 2023 पासून लागू झाला आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक एफडी व्याज दर
युनिटी स्मॉल फायनान्स बँक सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 4.50 टक्के ते 9.50 टक्के व्याजदर देत आहे. ही बँक 1001 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर सर्वाधिक 9.50 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. दुसरीकडे, ही बँक 501 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 9.25 टक्के व्याजदर देत आहे. बँक 6 महिने ते 201 दिवसांदरम्यान परिपक्व होणाऱ्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 9.25 टक्के व्याजदर देत आहे. हा व्याजदर 11 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात आला आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक एफडी
Fincare Small Finance Bank सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी FD वर 3.60 टक्के ते 9.11 टक्के व्याजदर देते. ही बँक 750 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 9.11 टक्के व्याजदर देते आहे. हा व्याजदर 26 जुलै 2023 पासून लागू आहे.
सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक एफडी
सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 4.50 टक्के ते 9.10 टक्के दरम्यान व्याजदर देते. दोन ते तीन वर्षांच्या मुदतीच्या FD वर सर्वाधिक 9.10 टक्के व्याजदर दिला जात आहे. ही बँक 15 महिने ते दोन वर्षांच्या मुदतीच्या FD वर 9 टक्के व्याज देत आहे. ही व्याज ऑफर 7 ऑगस्ट 2023 पासून लागू आहे.
ESAF स्मॉल फायनान्स बँक एफडी दर
ESAF स्मॉल फायनान्स बँक सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 4.50 टक्के ते 9 टक्के पर्यंत व्याज देत आहे. बँक दोन वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर सर्वाधिक 9 टक्के दराने व्याज देत आहे. हा व्याजदर 14 एप्रिल 2023 पासून लागू आहे.













