SBI Scheme : SBI ची सर्वोत्तम योजना ! जेष्ठ नागरिकांना मिळेल सर्वाधिक परतावा

Published on -

SBI Scheme : SBI ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे, जी आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना ऑफर करते, या योजना ग्राहकांना खूप चांगला परतावा देतात, आज आपण SBI च्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. जी सर्वाधिक परतावा ऑफर करत आहे.

SBIची WeCare FD अशा योजनांपैकी एक आहे जी सध्या जास्त परतावा ऑफर करत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने 60 वर्षांवरील वयोगटासाठी जास्त व्याज देण्यासाठी ही योजना सुरू केली होती. दरम्यान, SBI Wecare FD योजना काही दिवसातच बंद होणार आहे. यामध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2024 आहे. जर तुम्ही यात गुंतवणूक करण्याची योजना करत असाल तर तुमच्यकडे ही शेवटची संधी आहे.

WeCare FD योजनेत, ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा 0.50 टक्के अधिक व्याज मिळते. या योजनेअंतर्गत, सध्या 5 वर्षे ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 7.50 टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये तुम्ही 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम गुंतवू शकता.

SBI च्या या योजनेअंतर्गत अनेक सुविधा देखील उपलब्ध आहेत. मुदत ठेवींवर अतिरिक्त 0.80 टक्के व्याज उपलब्ध आहे. नेट बँकिंग आणि योनो ॲपद्वारेही याचा लाभ घेता येईल. यात कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. येथे मासिक/तिमासिक व्याज उपलब्ध आहेत. जर एखाद्या व्यक्तीने मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढले तर त्याला 0.50 टक्के दंड भरावा लागेल.

वेकेअर एफडी योजनेसोबतच अमृत कलश योजनाही बंद होणार आहे. या योजनेअंतर्गत 400 दिवसांच्या FD वर 7.10 टक्के व्याज मिळते. यामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe