Best Shares : शेअर मार्केट साठी मागील पाच वर्ष चढ उताराचे राहिले आहेत. या वर्षात तर शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. भूराजकीय तणावाचा शेअर मार्केटला मोठा फटका बसला. अमेरिकेचे टेरिफ धोरण सुद्धा शेअर मार्केट साठी धोकादायक ठरले.
दरम्यान शेअर मार्केटमध्ये झालेल्या घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदारांचे करोडो रुपये यामुळे पाण्यात गेले आहेत. मात्र मागील पाच वर्षात गुंतवणूकदारांना काही स्टॉक मधून चांगले रिटर्न मिळाले आहेत आणि आज आपण अशाच सहा शहर बाबत माहिती पाहणार आहोत.

आज आपण ज्या टॉप शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत त्यांनी मागील पाच वर्षांच्या काळात गुंतवणूकदारांना वार्षिक 124 टक्के दराने रिटर्न दिलेले आहे.
हे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी ठरलेत फायदेशीर
Fertilizers and Chemicals Travancore : यावर्षी हा स्टॉक प्रचंड दबावात राहिला आहे. मात्र मागील पाच वर्षांच्या काळात या शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगले रिटर्न मिळाले आहेत. या शेअर्सने मागील पाच वर्षात CAGR 82 टक्के प्रमाणे रिटर्न दिले आहेत.
Persistent Systems : मागील पाच वर्षांच्या काळात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 83% CAGR प्रमाणे रिटर्न दिलेले आहेत. ही आयटी कंपनी गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरली आहे. मात्र हे वर्ष कंपनीसाठी फारसे उत्साहवर्धक राहिलेले नाही.
GE Vernova T&D India : वीज आणि ट्रान्समिशनची ही कंपनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्यास सक्षम राहिली आहे. मागील पाच वर्षाच्या काळात या कंपनीच्या शेअर्सने 85% चा CAGR दिला आहे. यावर्षी आत्तापर्यंत या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र अलीकडील काही दिवसांमध्ये याच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
Jindal Stainless : या स्टील कंपनीची मागील पाच वर्षात जबरदस्त चलती राहिली आहे. स्टील कंपनी जिंदाल स्टेनलेसच्या शेअर्सनी गेल्या पाच वर्षांत 90 टक्के CAGR नुसार रिटर्न दिले आहेत. अर्थात मागील पाच वर्षांमध्ये त्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळाला आहे.
Rail Vikas Nigam Limited (RVNL) : ह्या शेअर्सनी गेल्या पाच वर्षांत 95 टक्के CAGR नुसार रिटर्न दिले आहेत. यामुळे हे स्टॉक नेहमीच फोकस मध्ये राहतात.
BSE : बीएसई लिमिटेड अर्थातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) लिमिटेड पण सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या शेअर्सच्या यादीत आहे. गेल्या पाच वर्षांत ह्या शेअर्सने 124 टक्के CAGR वार्षिक रिटर्न दिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे 2025 मध्ये आत्तापर्यंत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 49 टक्के रिटर्न दिले आहेत.













