बिकानेरच्या खाद्य पदार्थांचा विचार केला तर लगेच डोळ्यासमोर नाव येते भुजिया, चिवडा आणि रसगुल्ल्याचे. हे त्यांचे काही फेमस आयटम. पण बिकानेर हे खास त्याच्या नमकीन भुजियांसाठी प्रसिद्ध आहे.
खरंतर बिकानेर हे बिकानेरी भुजियामुळे प्रसिद्ध झाले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल आज हा भुजिया इथून जगातील बहुतेक देशांमध्ये पाठवला जातो. पण या सर्वांमधे प्रसिद्ध आहे बिकानेरवालाचे भुजिया.
केदारनाथ अग्रवाल अर्थात काकाजी यांनी बिकानेरवालाची सुरवात केली होती. आज आपण त्यांनी एका गल्लीतून सुरु केलेली भुजिया टेस्ट भारतासह परदेशातही कशी पोहोचवली, त्यांची सुरवात कशी झाली याची यशोगाथा पाहणार आहोत-
1905 साली लावलं होत छोटस रोपटं :- काकाजींनी 1905 मध्ये बिकानेरमध्ये छोटा दुकान सुरु करून या व्यवसायाचं छोटा रोपटं लावलं होत. ते त्यांच्या घराजवळच भुजिया विकायचे. पण काकाजींच्या मनात मोठं काहीतरी करायचं होत.
1930 मध्ये ते दिल्लीला गेले आणि आपल्या भावासोबत तेथे भुजिया विकू लागले. त्यांच्या उत्कृष्ट चवीमुळे, दोन्ही भाऊ लवकरच त्यांच्या भुजियासाठी प्रसिद्ध झाले. यानंतर काकाजींनी चांदणी चौकातच एक छोटेसे दुकान सुरू केले
आणि तेथून हा व्यवसाय अमेरिका, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड पर्यंत पोहोचवला. आज ते हयात नसले तरी आज त्यांच्या भुजियाची चव भारताबरोबर परदेशातही चाखली जात आहे.
छोट्या बादलीतून सुरु केलेला व्यवसाय आज 2300 कोटी रुपयांची कंपनी बनलीय :- हा प्रवास भुजियापासून सुरू झाला. एका बादलीत भुजिया घेऊन ते विकायचे. पण आज ही कंपनी भुजियासोबत बिकानेर मिठाई आणि नमकीनसाठी प्रसिद्ध आहे. आज ही कंपनी जवळपास 2300 कोटी रुपयांची कंपनी बनलीय. भारतसह परदेशातही हा व्यवसाय विस्तारला आहे.