Gold Price Today : सोन खरेदीच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. सलग पाच दिवसांपासून सोन्याच्या किमतीत वाढ होत असून यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे तर दुसरीकडे गुंतवणूकदारांना यातून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.
काल सलग पाचव्या दिवशी या मौल्यवान धातूच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, आज आपण गेल्या पाच दिवसांमध्ये या मौल्यवान धातूची किंमत किती वाढली आहे याचा आढावा या लेखातून घेणार आहोत.

मागील 5 दिवसात सोन्याच्या किंमती किती वाढल्यात?
1 जून : 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,200 आणि 24 कॅरेट ची किंमत 97 हजार 310 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती.
2 जून : या दिवशी 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 600 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 840 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती.
3 जून : 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 60 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती.
4 जून : 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,170 रुपये प्रति दहा ग्राम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 900 एवढी होती.
5 जून : 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 300 रुपये एवढी होती.
6 जून रोजीच्या सोन्याच्या किंमती जाणून घ्या
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 600 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 300 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,700 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक, लातूर, वसई विरार आणि भिवंडी : या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 630 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 330 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,730 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली आहे.