HDFC Bank FD Interest Rates : खाजगी क्षेत्रातील बँक HDFC बँकेने दोन विशेष कालावधीमधील FD वरील व्याजदर कमी केले आहेत. ही वजावट 35 महिने आणि 55 महिन्यांच्या FD वर करण्यात आली आहे. हे नवीन दर 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाले आहेत.
आतापर्यंत बँक 35 महिन्यांच्या एफडीवर 7.20 टक्के आणि 55 महिन्यांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याजदर देत होती. आता बँकेने दोन्ही व्याजदर 5 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.05 टक्के कमी केले आहेत.
एफडीवरील व्याजदर किती कमी झाले?
एचडीएफसी बँकेने 4 वर्ष 7 महिने अर्थात 55 महिन्यांच्या एफडीवरील व्याजदरात 5 बीपीएसने कपात केली आहे. यापूर्वी एचडीएफसी बँकेने ग्राहकांना याच मुदतीच्या एफडीवर 7.25 टक्के आणि वृद्धांना 7.75 टक्के व्याज दिले होते. एचडीएफसी बँकेसह इंडसइंड बँक,
पंजाब अँड सिंध बँकेनेही आपल्या एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. इंडसइंड बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. ताज्या बदलांनंतर बँक आता सर्वसामान्यांसाठी 3.50% ते 7.85% आणि
ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.25% ते 8.25% पर्यंत व्याज दर देत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे दर 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होतील.