गुंतवणूकदारांसाठी मोठी खुशखबर! वेदांत लवकरच देणार मोठा लाभांश…’ही’ तारीख ठेवा लक्षात

Published on -

Vedanta Share Price:- शेअर बाजारात आज वेदांत लिमिटेडच्या हालचालींनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले. २०२६ या आर्थिक वर्षातील पहिल्या लाभांशाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे वेदांतच्या शेअरमध्ये दिवसभरात चढ-उतार पाहायला मिळाले. बाजारात उत्सुकता वाढलेली असताना, शेवटी शेअर किंचित वाढीसह बंद झाला.

अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांत लिमिटेड या आठवड्यात १८ जून रोजी संचालक मंडळाची बैठक घेणार आहे. या बैठकीत चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या अंतरिम लाभांशावर निर्णय घेतला जाणार आहे. सध्या कंपनीने लाभांशाची रक्कम जाहीर केलेली नाही, पण त्यासाठीची ‘रेकॉर्ड तारीख’ आधीच निश्चित करण्यात आली असून ती तारीख आहे २४ जून. म्हणजेच, ज्यांच्याकडे २४ जूनपर्यंत वेदांतचे शेअर्स असतील, त्यांनाच लाभांशाचा हक्क मिळणार आहे.

वेदांताच्या शेअर्समध्ये किती झाली वाढ?

या घोषणेनंतर शेअर बाजारात वेदांतच्या शेअर्समध्ये खरेदी-विक्रीला जोर आला. बीएसईवर शेअरने १.२७% वाढ घेत ₹४६३.६० पर्यंत झेप घेतली. काही गुंतवणूकदारांनी नफा बुकिंगचा मार्ग पत्करल्यामुळे किंमत थोडीशी खाली आली, आणि ती एकवेळ ₹४५६.७५ वर आली. पण त्यानंतर पुन्हा खरेदीचा ओघ सुरु झाला आणि शेवटी तो वाढीवरच बंद झाला.

मागील काही दिवसांपूर्वी पाहिलं तर मागील आर्थिक वर्षात वेदांतने तब्बल चार वेळा लाभांश दिला होता. प्रत्येकी ₹४, ₹११, ₹२० आणि ₹८.५. त्यामुळे यंदाही गुंतवणूकदारांची अपेक्षा मोठी आहे. विशेषतः वेदांतच्या सहकंपनी हिंदुस्तान झिंकने नुकतेच ₹१० चा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. त्यातील ६३.४२% हिस्सा वेदांतकडे असल्यामुळे त्यांना एकट्या या लाभांशातून ₹२६७९.५५ कोटी मिळणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!