शेअर मार्केटमध्ये मोठी बातमी! एनएसई IPO लवकरच येणार? सेबी अध्यक्षांचे संकेत

Published on -

NSE IPO:- आज शेअर बाजारात एक महत्त्वाची बातमी चर्चेत राहिली व ती म्हणजे देशातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या आयपीओबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. अनेक वर्षांपासून बाजारात चर्चेचा विषय असलेला हा आयपीओ अखेर प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती खुद्द सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी दिली. त्यांच्या वक्तव्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना पांडे यांनी सांगितले की, NSE चा आयपीओ आणण्यात आता फारसा वेळ लागणार नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, एनएसईच्या आयपीओला कोणताही अडथळा उरलेला नाही. त्यामुळे ही प्रक्रिया लवकरच मार्गी लागेल, अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत ‘क्लिअरिंग कॉर्पोरेशन’च्या डिमर्जरचा मुद्दा अडथळा ठरणार नाही, असेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं.

क्लिअरिंग कॉर्पोरेशनचा डिमर्जर म्हणजे नक्की काय?

हा डिमर्जर म्हणजे एक वेगळं तांत्रिक पाऊल असून, ते आयपीओसाठी पूर्वअट असल्यासारखं मांडलं जात होतं. मात्र, सेबीच्या अध्यक्षांनी हे साफ केलं की, अशा कोणत्याही प्रक्रियेमुळे आयपीओ थांबणार नाही. ही फक्त एक नियामक विचारविनिमयाची बाब आहे. एनएसईला आवश्यक ते सर्टिफिकेट मिळाले की, ते थेट सेबीकडे आयपीओचा अर्ज दाखल करतील.

परंतु या सगळ्यात एक जुना वाद अजूनही चर्चेत आहे व तो म्हणजे को-लोकेशन प्रकरण. काही वर्षांपूर्वी काही ब्रोकर्सवर असा आरोप झाला होता की, त्यांनी एनएसईच्या मुख्य सर्व्हरच्या अगदी जवळ आपले सर्व्हर ठेवले होते, त्यामुळे त्यांना इतर ब्रोकर्सपेक्षा काही मिलीसेकंद आधी डेटा मिळत होता. यामुळे त्यांना अनुचित फायदा झाला, आणि या प्रकरणामुळे एनएसईची विश्वासार्हता धोक्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली, आणि आता समजते की त्याचे निकाल अंतिम टप्प्यात आहेत.

सेबी आणि एनएसई यांच्यात या प्रकरणावर चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे. एकदा या मुद्द्याचं योग्य समाधान झालं, की आयपीओच्या प्रक्रियेस अधिकृत मंजुरी मिळू शकते. एनएसईने यासाठी सेबीला वेळोवेळी पत्रं लिहून प्रलंबित मुद्दे निकालात काढण्याची विनंती केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आणि यावर्षी मार्चमध्येही एनएसईने अशा प्रकारची अधिकृत मागणी केली होती. त्यांच्या गव्हर्निंग बोर्डानेही हे सर्व मुद्दे वाटाघाटीद्वारे सोडवण्याला पाठिंबा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!