मोठी बातमी ! देशातील ‘या’ बड्या बँकांनी वाढवले एफडी वरील व्याजदर, आता किती मिळणार रिटर्न ? वाचा

Published on -

FD Interest Rate : गेल्या काही वर्षांमध्ये एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचे कारणही तसे खासच आहे. देशातील अनेक बड्या बँकांनी आता एफडीवरील व्याजदर वाढवले आहे.

परिणामी एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा आता बँकेतील एफडीला विशेष महत्त्व दिले जात आहे. अशातच आता एफडी करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील काही बड्या बँकांनी एफडी वरील व्याजदर वाढवले आहे. आता आपण देशातील कोणत्या बड्या बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवले आहे याविषयी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ इंडिया ही देशातील एक अग्रगण्य बँक आहे. या बँकेचे लाखो ग्राहक आहेत. दरम्यान या बँकेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले आहे.

या बँकेने डिसेंबर २०२३ मध्ये एफडी व्याजदर वाढवले ​​आहेत. बँकेने 1 डिसेंबर 2023 पासून आपल्या ग्राहकांसाठी (₹2 कोटींपेक्षा जास्त आणि ₹10 कोटींपेक्षा कमी) मुदत ठेवींचे व्याजदर वाढवण्याचा एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला ​​आहे.

सदर बँकेने अल्प कालावधीसाठी मुदत ठेवींचे दर वाढवले ​​आहेत. बँक ऑफ इंडियाने 46 दिवस ते 90 दिवसांसाठी 5.25 टक्के, 91 दिवस ते 179 दिवसांसाठी 6.00 टक्के, 180 दिवस ते 210 दिवसांसाठी 6.25 टक्के, 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 6.50 टक्के व्याजदर जाहीर केले आहेत. तसेच 1 वर्षाच्या FD साठी 7.25 टक्के एवढे व्याजदर निश्चित करण्यात आले आहे. पण हे वाढीव व्याजदर फक्त दोन कोटी ते दहा कोटी दरम्यान एवढी करणाऱ्यांनाच लागू होणार आहेत.

कोटक महिंद्रा बँक : ही देखील देशातील एक मोठी बँक आहे. या बँकेचे देखील लाखो ग्राहक आहेत. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असते. या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षक योजना सातत्याने जाहीर केल्या जातात.

कमी व्याजदरात कर्ज पुरवले जाते. दरम्यान आता कोटक महिंद्रा बँकेने एफडी वरील व्याजदर वाढवले आहे. या बँकेने तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी केल्या जाणाऱ्या FD च्या व्याजदरात वाढ केली आहे.

या नवीन बदलानंतर, या बँकेत सात दिवस ते दहा वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर सामान्य ग्राहकांसाठी 2.75 टक्के ते 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.35 टक्के ते 7.80 टक्के व्याजदर लागू करण्यात आले आहेत.

फेडरल बँके : ही देखील देशातील एक महत्त्वाची बँक आहे. दरम्यान या बँकेने सरत्या वर्षात एक मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार या बँकेत एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांना अधिकचे व्याजदर मिळणार आहे.

फेडरल बँकेने 5 डिसेंबर 2023 पासून एफडीचे दर वाढवले ​​आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 500 दिवसांसाठीचा व्याजदर 7.50 टक्के करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, फेडरल बँक आता 500 दिवसांच्या कालावधीसाठी 8.15 टक्के आणि 21 महिन्यांहून अधिक ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी 7.80 टक्के परतावा देऊ लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe