FD Rate : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याला आपल्या देशात विशेष पसंती दाखवले जाते. मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास नागरिकांना शाश्वत रिटर्न मिळतो. निश्चितच एफडी मधील गुंतवणूक ही शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीपेक्षा कमी परतावा देते
मात्र यामध्ये सुरक्षितता खूपच अधिक आहे. हेच कारण आहे की अनेक लोक अजूनही मुदत ठेवीत गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व देतात. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खाजगी क्षेत्रातील विविध बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याजदर देखील देऊ लागल्या आहेत.

अशातच आता देशातील एका खाजगी क्षेत्रातील बड्या बँकेने एफडीचे व्याजदर वाढवले असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एफ डी चे व्याजदर वाढवले आहेत.
वास्तविक कोटक महिंद्रा ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील एक मोठी बँक आहे. या बँकेचे लाखो ग्राहक आहेत. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन कौतुकास्पद निर्णय घेत असते. दरम्यान काल अर्थातच 11 डिसेंबर 2023 रोजी कोटक महिंद्रा बँकेने एफडीचे व्याजदर वाढवण्याचे जाहीर केले आहे.
बँकेने 0.50 ते 0.85% पर्यंतचे एफडीचे व्याजदर वाढवले आहे. दोन करोड रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स डिपॉझिटसाठी ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रातील या बड्या बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे या बँकेत एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
किती वाढलेत व्याजदर
बँकेने जारी केलेल्या सर्क्युलर नुसार, सामान्य ग्राहकांसाठी एफडी चे व्याजदर हे 0.50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी चे व्याजदर हे 0.85 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांचे एफडी चे व्याजदर हे सामान्य नागरिकांच्या तुलनेत अधिक वाढवण्यात आले आहेत. निश्चितच या निर्णयाचा ज्येष्ठांना मोठा फायदा मिळणार आहे. यामुळे त्यांना कोटक महिंद्रा बँकेत केलेल्या एफ डी च्या मोबदल्यात चांगला परतावा मिळू शकणार आहे.
सदर बँकेने म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिकांना 23 महिने ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी 7.80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. तसेच तीन ते चार वर्षांच्या मुदतीच्या अन 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करणाऱ्या FD साठी 0.50 टक्के वाढ केल्यामुळे नियमित ग्राहकांना 7% व्याजदर मिळणार आहे.
याशिवाय चार ते पाच वर्षांच्या मुदतीच्या FD वरील व्याजदर आता 0.75 टक्क्यांच्या वाढीनंतर 6.25 टक्क्यांवरून 7 टक्के वर आल्याचे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.