Home Loan EMI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 7 फेब्रुवारी 2025 रोजी रेपो दरात 0.25% कपात करून तो 6.25% केला आहे. हा निर्णय गेल्या पाच वर्षांतील पहिली कपात असल्यामुळे कर्जदारांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे.विशेषतः होमलोन घेतलेल्या ग्राहकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण रेपो दर कमी झाल्यास बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर देखील कमी होण्याची शक्यता असते.याचा थेट परिणाम गृहकर्जाच्या ईएमआयवर होऊ शकतो आणि ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळू शकतो.
होमलोन घेणाऱ्यांना कसा होईल फायदा?
उदाहरणार्थ सध्या 30 लाख रुपयांच्या गृहकर्जावर 8.50% वार्षिक व्याजदर असल्यास 20 वर्षांच्या कालावधीत मासिक EMI सुमारे 25,846 आहे. मात्र रेपो दरात 0.25% कपातीनंतर जर बँकांनी व्याजदर 8.25% पर्यंत खाली आणला तर नवीन EMI 25,386 इतका होईल. याचा अर्थ कर्जदारांना दरमहा 460 ची बचत करता येणे शक्य आहे.ही बचत पाहता 20 वर्षांत एकूण 1,10,400 इतका अतिरिक्त खर्च वाचू शकतो.त्यामुळे गृहकर्जदारांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून व्याजदरातील संभाव्य बदलांबाबत चौकशी करणे फायदेशीर ठरेल.
होमलोन लवकर फेडण्यासाठीचे उपाय
गृहकर्जाचा ईएमआय लवकर पूर्ण करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करता येऊ शकतात.दरवर्षी प्रीपेमेंट करणे हा एक प्रभावी पर्याय आहे.जर एखाद्याला बोनस, कर परतावा किंवा काही अतिरिक्त बचत मिळाली.तर ती रक्कम कर्जाच्या मुख्य रकमेत भरल्यास व्याजाचा भार कमी होईल आणि कर्जाचा कालावधीही लहान होऊ शकतो. तसेच उत्पन्न वाढल्यास EMI वाढवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.सुरुवातीच्या काही वर्षांत थोडासा जास्त EMI भरल्यास व्याज कमी लागू शकते आणि कर्ज लवकर फेडले जाऊ शकते.
याशिवाय गृहकर्जदारांनी वेगवेगळ्या बँकांकडून मिळणाऱ्या व्याजदरांची तुलना करावी आणि कमी व्याजदर असलेल्या बँकेत कर्ज हस्तांतरित करण्याचा पर्याय विचारात घ्यावा.मात्र कर्ज हस्तांतरण करताना प्रक्रिया शुल्क आणि अतिरिक्त खर्च विचारात घेणे महत्त्वाचे आहे.बजेट नीट नियोजित केल्यास अनावश्यक खर्च टाळून कर्ज लवकर फेडण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
आरबीआयच्या निर्णयामुळे कर्जदारांना फायदा
आरबीआयच्या या निर्णयामुळे गृहकर्जदारांना मोठा दिलासा मिळू शकतो.परंतु हा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बँका त्यांच्या व्याजदरांमध्ये कपात करणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.गृहकर्ज घेतलेल्या आणि घेण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांनी या घडामोडींकडे लक्ष द्यावे आणि आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडावा.