Satana Merchants Co-op Bank : नाशिकमधील सटाणा मर्चंट्स को-ऑप बँकेत निघाली मोठी भरती; वाचा सविस्तर बातमी…

Satana Merchants Co-op Bank Bharti : नाशिक मध्ये राहत असाल आणि बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. सध्या नाशिकमधील सटाणा मर्चंट्स को-ऑप बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, तसेच यासाठी कधी पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत हे जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.

वरील भरती अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखा अधिकारी, अधिकारी आणि लिपिक” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील जागांसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी, MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा ही 30 वर्षे आहे, यापुढील उमेदवार अर्ज करण्यास पात्र नसतील.

अर्ज शुल्क

यासाठी अर्ज शुल्क देखील भरवायाचे आहे. हे शुल्क जी.एस.टी. धरून ५९०/- रुपये आहे. तसेच परीक्षा शुल्क जी.एस.टी. धरून एकूण ९४४/- रुपये असे आहे.

अर्ज पद्धती

या जागांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदांसाठी अर्ज https://www.rect-118.mucbf.in/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज दुसऱ्या कोणत्याही मार्गे स्वीकारला जाणार नाही, दिलेल्या संबंधित लिंकद्वारेच अर्ज स्वीकारले जातील.

-अर्जासह अर्ज शुल्क भरणे देखील अनिवार्य आहे. जे उमेदवार अर्ज शुल्क भरणार नाहीत, त्यांचा अर्ज नाकारला जाईल.

-या भरती करिता अर्ज 14 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe