ATM Change Rule:- एटीएमद्वारे पैसे काढण्यासाठी लागणारे शुल्क लवकरच वाढण्याची शक्यता आहे.ज्यामुळे एटीएम वापरकर्त्यांवर थेट परिणाम होईल. सध्या बऱ्याच बँकांमध्ये ग्राहकांना प्रत्येक महिन्यात पाच मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा मिळते. परंतु या मर्यादेनंतर ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी एक शुल्क भरावे लागते.
या संदर्भात राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक प्रस्ताव तयार केला असून ज्यात एटीएमद्वारे पैसे काढण्याचे शुल्क २१ रुपयांवरून २२ रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे पाच मोफत व्यवहार ओलांडल्यानंतर ग्राहकांना एक रुपयाने अधिक शुल्क भरावे लागेल.
एनपीसीआयने दिला शुल्कवाढीचा प्रस्ताव
त्याचप्रमाणे NPCI ने एटीएम इंटरचेंज फीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. एटीएम इंटरचेंज फी म्हणजे जेव्हा एक ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढतो तेव्हा त्या बँकेला भरावे लागणाऱ्या शुल्काचा समावेश होतो.सध्या ही फी १७ रुपये आहे. जी २ रुपयांनी वाढवून १९ रुपये केली जाऊ शकते. याशिवाय ऑनलाइन व्यवहारांसाठी देखील शुल्क वाढवले जाऊ शकते ते ६ रुपयांवरून ७ रुपये होऊ शकते. हे सर्व प्रस्ताव एकत्र केल्यास बँकांसाठी आणि एटीएम ऑपरेटरसाठी होणारा खर्च वाढतो आणि त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होतो.कारण हे शुल्क सहसा ग्राहकांकडूनच एटीएम शुल्काच्या स्वरूपात घेतले जातात.
ग्रामीण भागातील युजर्सवर होईल परिणाम
NPCI च्या या प्रस्तावाला बँकिंग क्षेत्रातील तज्ञ आणि बँकांनी मान्यता दिली आहे. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील एटीएम वापरकर्त्यांवर या बदलांचा मोठा प्रभाव होईल. कारण तिथे एटीएम ऑपरेशन्सचे खर्च अधिक आहेत. त्यामुळे एटीएम वापरणाऱ्यांना या बदलांमुळे अधिक खर्च सहन करावा लागू शकतो. यावर एक महत्त्वाची बैठकही आयोजित केली गेली आहे. ज्यामध्ये भारतीय बँक असोसिएशन, एसबीआय (स्टेट बँक ऑफ इंडिया) आणि एचडीएफसी बँक यासारख्या प्रमुख बँकांच्या अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. या समितीने स्पष्ट केले की,बँकिंग क्षेत्राच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे आणि म्हणूनच एटीएम व्यवहारांवरील शुल्क वाढवण्याची गरज आहे.
बँकिंग क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे की, काही वर्षांत एटीएम चालवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे एटीएममध्ये पैसे भरणे, देखभाल आणि ऑपरेशन यांचा खर्च वाढला आहे. विशेषतः ग्रामीण भागात आणि छोटे शहरांमध्ये एटीएम ऑपरेशन्सचा खर्च वाढलेला आहे. महागाईमुळे या खर्चात आणखी वाढ झाली आहे. ज्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडू शकतो. एटीएम वापरकर्त्यांसाठी हे मोठे बदल असू शकतात. कारण या बदलांमुळे त्यांना अधिक शुल्क भरावे लागू शकते. यावर आरबीआय किंवा NPCI कडून अधिकृतपणे पुष्टी मिळालेली नाही.पण बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या या बदलांवर चर्चा सुरू आहे.