NSDL Share Price:- आज महत्त्वाचे असलेले निर्देशांक म्हणजेच बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले. सध्याची जरा आकडेवारी बघितली तर बीएसई सेन्सेक्स 746.29 अंकांनी वधारून 80604.08 वर पोहोचला आहे तर निफ्टी मध्ये 221.75 अंकांनी वधारला आहे व या वाढीसह 24585.05 वर पोहोचला आहे. या सगळ्या सकारात्मक वाढीचा परिणाम अनेक महत्त्वाच्या शेअर्सच्या किमती वाढण्यामागे दिसून आला. परंतु या सकारात्मक वातावरणात देखील मात्र नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीचा शेअर्स मात्र घसरला असून यामध्ये तब्बल 29.15 अंकांची घसरण दिसून येत आहे.
NSDL च्या शेअरमध्ये झाली मोठी घसरण
आज सोमवार असून ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस होता. जेव्हा आज ट्रेडिंगला सुरुवात झाली तेव्हा एनएसडीएलचा शेअर 1301 रुपयांवर ओपन झाला. तसेच या शेअरची मागील बंद किंमत पाहिली तर ती 1300 रुपये इतकी होती. तसेच आजची नीचांकी किंमत पातळी 1257 रुपये तर उच्चांकी पातळी 1425 रुपये इतकी दिसून आली. सध्या जर आपण या शेअरची किंमत बघितली तर यामध्ये 29.15 अंकांची घसरण झाल्याचे दिसून येत आहे व या घसरणीसह हा शेअर सध्या 1271.15 ट्रेड करत आहे. नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी फंडामेंटलचे मार्केट कॅप सध्या 25423 कोटी रुपये इतके आहे.
