Bonus Share 2026 : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एकदा कमाईची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबईमधील एका बड्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक घोषणा केली आहे. मुंबईस्थित रिअल इस्टेट कंपनी अंतरिक्ष इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या सार्वजनिक शेअरधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे.
कंपनीने १:१० या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्याची शिफारस केली आहे. यामुळे या कंपनीच्या शेअर होल्डर्सला कमाईची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे जे गुंतवणूकदार बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करू इच्छित असतील त्यांच्यासाठी देखील ही एक मोठी संधी राहणार आहे.

दरम्यान आता आपण कंपनीच्या या घोषणाची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. खरेतर, संचालक मंडळाच्या ३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यानुसार, ज्यांच्याकडे कंपनीचे १० शेअर्स आहेत, त्यांना एक अतिरिक्त शेअर मोफत मिळणार आहे.
विशेष म्हणजे, हा बोनस इश्यू फक्त सार्वजनिक शेअरधारकांसाठी उपलब्ध असणार असून, प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाच्या हिस्सेदारीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे याची रेकॉर्ड तारीख पण जाहीर करण्यात आली आहे.
कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या निवेदनात सांगितले की, ९ जानेवारी २०२६ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. या तारखेपर्यंत शेअर्स धारण करणारे गुंतवणूकदार बोनस शेअर्ससाठी पात्र ठरणार आहेत.
रेकॉर्ड डेटपूर्वी शेअर्स खरेदी करणारे आणि होल्डिंग कायम ठेवणारे गुंतवणूकदारही या लाभाचा फायदा घेऊ शकतात. अंतरिक्ष इंडस्ट्रीजच्या मते, या बोनस इश्यूचा उद्देश कंपनीतील सार्वजनिक शेअरहोल्डिंगची टक्केवारी वाढवणे हा आहे.
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) नियमांनुसार सूचीबद्ध कंपन्यांना बाजारात एक विशिष्ट किमान सार्वजनिक भागीदारी पातळी राखावी लागते. कंपनीने याच अनुषंगाने हा बोनस इश्यू सार्वजनिक गुंतवणूकदारांसाठीच मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे स्टॉकची लिक्विडिटी वाढण्यास मदत होईल, तसेच गुंतवणूकदार बेसही अधिक मजबूत होईल, असा कंपनीचा विश्वास आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा बोनस इश्यू अजून अंतिम झालेला नाही. प्रस्तावाला पोस्टल बैलेटद्वारे शेअरहोल्डर्सची मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
मंजुरी मिळाल्यानंतर, बोर्ड बैठकीच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत म्हणजेच २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत, पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात बोनस शेअर्स जमा करण्यात येतील.
अंतरिक्ष इंडस्ट्रीज लिमिटेडच्या या निर्णयामुळे अल्प गुंतवणूकदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोनस शेअर इश्यूमुळे त्यांच्या होल्डिंगचे मूल्य वाढण्यास मदत होईल, तसेच कंपनीवरील विश्वास देखील अधिक मजबूत होईल.
रिअल इस्टेट क्षेत्रातील इतर कंपन्या सार्वजनिक हिस्सेदारी वाढवण्यासाठी कोणते पावले उचलतात, याकडेही आता बाजाराचे लक्ष लागले आहे. एकूणच, अंतरिक्ष इंडस्ट्रीजचा बोनस इश्यू हा सार्वजनिक गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारा आणि आकर्षक असा निर्णय मानला जात आहे.













