Bonus Share And Dividend : सध्या शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्यांच्या माध्यमातून सप्टेंबर तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच काही कंपन्या बोनस शेअर्स आणि डिव्हीडंटचाही लाभ दिला जात आहे. दरम्यान शेअर मार्केट मधील एका कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला बोनस शेअर्स आणि डिव्हिडंट असा दुहेरी लाभ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
देशातील आघाडीची डायग्नोस्टिक कंपनी थायरोकेअर टेक्नॉलॉजीजने हा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. कंपनीने नुकतेच सप्टेंबर तिमाही निकाल जाहीर केलेत.

यासोबतच आपल्या शेअर होल्डर्स ला बोनस शेअर्स आणि डिव्हीडंट देण्याची घोषणा केली. Thyrocare Technologies आपल्या शेअर होल्डर्सला 2:1 या प्रमाणात बोनस शेअर चे वाटप करणार आहे. तसेच कंपनीकडून सात रुपयांचा लाभांश देखील दिला जाणार आहे.
अर्थात कंपनीच्या पात्र शहर होल्डर्सला एका शेअर साठी दोन नवीन बोनस शेअर्स मिळणार आहेत. तसेच शेअर होल्डर्स ला सात रुपयांचा अंतरीम लाभांश मिळणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना अतिरिक्त कमाईची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
जे गुंतवणूकदार बोनस शेअर्स तसेच लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. दरम्यान आता आपण पूर्ण शेअर्स तसेच डिव्हीडंट देण्यासाठी कंपनीने काय रेकॉर्ड निश्चित केली आहे याबाबत माहिती पाहूया.
काय आहेत डिटेल्स
कंपनीने स्टॉक एक्सचेंज ला दिलेल्या माहितीनुसार सात रुपयांच्या अंतरीम लाभांशासाठी कंपनीकडून 24 ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. अर्थात या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना लाभांश मिळणार आहेत.
कंपनीच्या स्टॉकबाबत बोलायचं झालं तर वार्षिक आधारावर यामध्ये 21 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना दोन बोनस शेअर सुद्धा देणार आहे. परंतु यासाठीची रेकॉर्ड डेट अजून निश्चित करण्यात आलेली नाही.
यामुळे आता याची रेकॉर्ड डेट कधी फायनल होणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट मध्ये लवकरच कंपनीकडून याची रेकॉर्ड जाहीर केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.