Bonus Share News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. मार्केटमधील एका बड्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.
खरे तर अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवून असतात. तुम्ही सुद्धा अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे.

LKP Finance Limited ने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स वितरित करण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे शेअर मार्केटमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झालेली असतांनाही या कंपनीच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली.
बोनस शेअरची घोषणा झाल्यानंतर कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. ह्या कंपनीने सोमवारी मार्केट क्लोज झाल्यानंतर आपल्या गुंतवणूकदारांना मोठी भेट देत बोनस शेअरची घोषणा केली.
रेकॉर्ड तारीखबाबत कंपनीची मोठी अपडेट
LKP Finance Limited ने आपल्या शेअर होल्डर्सला चार मोफत शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनीकडून प्रत्येक पात्र शेअर्स वर चार मोफत शेअर्स दिले जाणार आहेत.
यासाठी ची रेकॉर्ड तारीख अजून जाहीर झालेली नाही पण येत्या काही दिवसांनी ही तारीख पण जाहीर होण्याची शक्यता आहे. या बोनस शेअरबाबतची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कंपनी पहिल्यांदाच अशा प्रकारचा लाभ आपल्या गुंतवणूकदारांना देणार आहे.
शेअर मार्केटमध्ये जोरदार विक्रीचे सत्र सुरू आहे. त्यामुळे मार्केटमध्ये प्रचंड दबाव दिसून येतोय पण अशा स्थितीत सुद्धा LKP Finance Limitedच्या शेअर्स मध्ये खरेदीचे सत्र सुरू आहे.
हा स्टॉक 1151 रुपयांच्या एन्ट्राडे हायवर पोहचलाय. सकाळच्या सत्रात या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाले होती मात्र नंतर थोडी घसरण झाली. मागील सहा महिन्यांच्या काळात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 120% इतके रिटर्न दिले आहेत.
तसेच गेल्या तीन महिन्यांच्या काळात या कंपनीचे स्टॉक 40 टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच मागील बारा महिन्यांच्या काळात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 412% इतका परतावा दिला आहे.













