Bonus Share News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. या आठवड्यात शेअर मार्केट मधील दोन बड्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरची भेट देणार आहेत. खरे तर शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्या सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश आणि बोनस शेअर्स देत असतात.
यामुळे अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा ठेवतात. दरम्यान जर तुम्ही पण बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा आठवडा लकी ठरणार आहे.

कारण की दोन मोठ्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स मिळवण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. यासाठीची रेकॉर्ड डेट याच सुद्धा आठवड्यात आहे.
कोणत्या कंपन्या देणार बोनस शेअर्स
Thyrocare Technologies : स्टॉक एक्सचेंज कडून मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअरचे वितरण करणार आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांकडे दोन शेअर्स असतील त्यांना एक बोनस शेअर मिळणार आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार बोनस शेअर्स साठीची रेकॉर्ड डेट 28 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. ही कंपनी हेल्थकेअर सेगमेंट मधील एक नामांकित कंपनी म्हणून ओळखली जाते.
अशा स्थितीत जर तुम्हाला बोनस शेअर चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पुढील तीन दिवसांमध्ये कंपनीचे शेअर्स विकत घ्यावे लागणार आहेत. दरम्यान बोनस शेअरची घोषणा झाल्यानंतर कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत.
HDFC Asset Management Company : या यादीतील ही दुसरी कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअरचे वितरण करणार अशी माहिती स्टॉक एक्सचेंज कडून मिळाली आहे.
अर्थातच ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचा एक शेअर असेल त्यांना एक बोनस शेअर मिळणार आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट 26 नोव्हेंबर 2025 फायनल करण्यात आली आहे.
म्हणजेच या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये असेल त्यांना बोनस शेअरचा लाभ मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही कंपनी पहिल्यांदाच बोनस शेअरचे वितरण करणार आहे. यामुळे सद्यस्थितीला ही कंपनी गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे.













