2:1 च्या प्रमाणात देणार Bonus Share ! ‘या’ कंपनीने केली मोठी घोषणा, गुंतवणूकदारांना दिलेत 1975 टक्के रिटर्न

Published on -

Bonus Share News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मल्टीबॅगर स्टॉक GRM ओव्हरसीजने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स देण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे.

हा शेअर सलग चौथ्या दिवशी तेजीत राहिला. आधीच तेजित असणारा हा स्टॉक बोनस शेअरच्या घोषणेमुळे आता पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहे. गुरुवारी GRM ओव्हरसीजच्या शेअर्सने 500 रुपयाचा टप्पा ओलांडला. हा शेअरचा 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक सुद्धा बनलाय.

गुरुवारी बीएसईवर कंपनीचे शेअर्स इंट्राडे 2% वाढून 502.95 रुपयांवर पोहोचलाय. जीआरएम ओव्हरसीजने अलीकडेच त्यांच्या शेअरहोल्डर्सना बोनस शेअर वितरणाची घोषणा केली आहे. दरम्यान आज आपण या कंपनीची मागील काही वर्षांमधील शेअर मार्केटवरील कामगिरी बाबत माहिती पाहणार आहोत.

गुंतवणूकदारांना मिळणार एका शेअरवर 2 बोनस शेअर 

स्मॉल-कॅप कंपनी जीआरएम ओव्हरसीजच्या संचालक मंडळाने अलीकडेच आपल्या गुंतवणूकदारांना पूर्ण शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरित करण्याचा निर्णय घेतलाय.

याचा अर्थ असा की कंपनी प्रत्येक शेअरसाठी दोन बोनस शेअर्स देईल. या घोषणेनंतर गुंतवणूकदारांकडून रेकॉर्ड डेट बाबत विचारणा होत आहे. कारण की रेकॉर्ड डेटपर्यंत ज्या गुंतवणूकदारांचे रेकॉर्ड बुक मध्ये नाव असेल त्यांना या बोनस शेअरचा लाभ मिळणार आहे.

नक्कीच कंपनीची ही घोषणा गुंतवणूकदारांसाठी कमाईची एक नवीन संधी घेऊन आली आहे आणि यामुळे कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. कंपनीच्या शेअरची खरेदी या घोषणेमुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कारण की या कंपनीची गेल्या पाच वर्षांची कामगिरी गुंतवणूकदारांसाठी फायद्याचीच राहिली आहे. पण, जीआरएम ओव्हरसीजने अद्याप बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. दरम्यान कंपनीने याआधी सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप केले आहे.

कंपनीने यापूर्वी जुलै 2021 मध्ये शेअरहोल्डर्सना एका शेअरवर दोन बोनस शेअर्स वितरित केले होते. तसेच कंपनीने आपले स्टॉक स्प्लिट सुद्धा केले आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीने तिचे शेअर्स 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या पाच शेअर्समध्ये विभागले. म्हणजे कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू दोन रुपये करण्यात आली.

शेअर मार्केट मधील कंपनीची कामगिरी कशी आहे?

नोव्हेंबर 2020 मध्ये कंपनीचा स्टॉक 24 रुपयांच्या आसपास ट्रेड करत होता. मात्र सध्या स्थितीला या कंपनीचे स्टॉक 502 रुपयांच्या आसपास व्यवहार करतायेत. म्हणजेच मागील पाच वर्षांमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 1975 टक्के रिटर्न मिळाले आहेत.

मागील एका वर्षात या कंपनीचे स्टॉक 150 टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच गेल्या सहा महिन्यांच्या काळात कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 60% रिटर्न दिले आहेत. म्हणजेच शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही परिस्थितीत हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी कुबेर का खजाना ठरला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News