‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना देणार 24 फ्री शेअर्स ! Bonus Share ची मोठी घोषणा

Published on -

Bonus Share News : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदार कंपनीच्या कामगिरी सोबतच तिच्याकडून दिल्या जाणाऱ्या कॉर्पोरेट लाभाच्या घोषणांची पण आतुरतेने वाट पाहत असतात. अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स तसेच लाभांश वितरित करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवतात.

दरम्यान जर तुम्हीही अशाच कंपनीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि मोठी कमाईची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार Apis India Limited ने आपल्या गुंतवणूकदारांना 24 मोफत शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. अर्थात ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 24:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्सचे वितरण करणार आहे.

म्हणजेच प्रत्येक पात्र गुंतवणूकदाराला एका शेअर मागे 24 बोनस शेअर्स वितरित करण्यात येणार आहेत. यामुळे कंपनीच्या या घोषणेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. दरम्यान कंपनीने बोनस इशू साठी ची रेकॉर्ड सुद्धा फायनल केली आहे.

केव्हा आहे रेकॉर्ड तारीख?

Apis India Limited च्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 24 बोनस शेअर्स वितरित करणार असून यासाठीची रेकॉर्ड पाच डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

म्हणजेच पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शेअर मार्केट गुंतवणूकदारांना कमाईची एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना कंपनीच्या बोनस शेअर चा लाभ मिळणार आहे.

कंपनीने चार दिवसांपूर्वी अर्थातच 21 नोव्हेंबर 2025 रोजी बोनस शेअरची घोषणा केली होती आणि तेव्हापासून या कंपनीचे स्टॉक मार्केटमध्ये चर्चेत आहेत. या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे.

बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख आणि एक्स-बोनस ट्रेड तारीख दोन्ही 5 डिसेंबर आहेत. म्हणजेच T+1 सेटलमेंट प्रणालीनुसार बोनस शेअरचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदारांना रेकॉर्ड तारखेच्या आधीच शेअर्स खरेदी करावे लागणार आहे.

4 डिसेंबर पर्यंत शेअर्सची खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांनाच बोनस शेअरचा लाभ मिळणार आहे. 4 डिसेंबर रोजी बाजार बंद होण्यापर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना बोनस शेअर चा लाभ मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe