Bonus Share : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एकदा कमाईची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 16000% रिटर्न देणाऱ्या कंपनीने पुन्हा एकदा पूर्ण शेअर्स वाटपाची घोषणा केली असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
खरंतर अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स तसेच डिव्हीडंट देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा ठेवतात. दरम्यान जर तुमची पण अशीच इच्छा असेल तर तुमच्यासाठी ऑटोरायडर्स इंटरनॅशनलचा पर्याय बेस्ट राहणार आहे.

कारण की ऑटोरायडरस इंटरनॅशनल ने आपल्या गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा बोनस शेअर्स वाटपाची घोषणा केली आहे. यामुळे या कंपनीचे शेअर्स फोकस मध्ये आले आहेत. दरम्यान आता आपण कंपनीच्या या घोषणाची डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना किती शेअर्स देणार आणि यासाठीची रेकॉर्ड डेट काय आहे या संदर्भातील माहिती आज आपण या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती बोनस शेअर्स मिळणार?
खरेतर कंपनीने आधी पण बोनस शेअर्स वाटले आहेत. ऑटोरायडर्स इंटरनॅशनलने यापूर्वी त्यांच्या शेअरहोल्डर्सना ऑक्टोबर 2017 मध्ये पुन्हा शेअर्स वाटलेले होते. त्यावेळी कंपनीने 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वाटले.
म्हणजेच, कंपनीने प्रत्येक शेअरसाठी एक बोनस शेअर वाटला. आता मल्टीबॅगर कंपनी ऑटोरायडर्स इंटरनॅशनल त्यांच्या शेअरहोल्डर्सना एक मोठी भेट देणार आहे. ऑटोरायडर्स इंटरनॅशनल त्यांच्या गुंतवणूकदारांना 5:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वितरित करणार आहे.
म्हणजेच, कंपनी प्रत्येक 1 शेअरसाठी 5 मोफत शेअर्स वितरित करेल. ऑटोरायडर्स इंटरनॅशनलचे शेअर्स मंगळवार, 18 नोव्हेंबर रोजी व्यवहार करतील, जो बोनस शेअर्सची विक्रमी तारीख आहे.
गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांत ऑटोरायडर्स इंटरनॅशनलचे शेअर्स 16 हजार टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. 14 नोव्हेंबर शुक्रवारी बीएसईवर कंपनीचे शेअर्स 5087 रुपयांवर क्लोज झालेत.
शेअरची कामगिरी कशी राहिली आहे
गेल्या दोन वर्षांत ऑटोरायडर्स इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये 16,819% वाढ झाली आहे. खरंतर डिसेंबर 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 30 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते. दरम्यान नोव्हेंबर 2025 मध्ये कंपनीचे शेअर्स 5087 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत आहेत.
तसेच गेल्या बारा महिन्यांच्या काळात या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 3294% रिटर्न दिले आहेत. बारा महिन्यांमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत 149 रुपयांवरून थेट पाच हजार रुपयांपेक्षा जास्त झाली आहे.













