Bonus Share : तुम्हालाही शेअर मार्केट मधून कॉर्पोरेट बेनिफिट हवा आहे का? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. गेल्या सहा महिन्यांच्या काळात आपल्या शेअर होल्डर्स चे पैसे दुप्पट करणाऱ्या एका कंपनीने बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा केली आहे.
तुम्हीही बोनस शेअर्स देणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही नक्कीच एक मोठी संधी ठरणार आहे. केल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत.

सोबतच बोनस शेअर्स व लाभांश देण्याचीही घोषणा केली जात आहे. दरम्यान शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना पुढील आठवड्यात आणखी काही बोनस शेअर्स मिळवण्याची एक संधी उपलब्ध झाली आहे.
कॉनकॉर्ड कंट्रोल सिस्टम्स लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना तीन बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा केली असून यामुळे कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. कंपनीच्या या घोषणेनंतर शेअर मार्केटमध्ये कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीच्या बोनस शेअर साठीची रेकॉर्ड डेट पुढील आठवड्यात आहे. कंपनीने बोनस शेअर्स बाबत स्टॉक एक्सचेंज ला माहिती दिली आहे. यामध्ये कंपनीने पाच शेअर्सवर तीन बोनस शेअर्स दिले जातील अशी घोषणा केली आहे.
यासाठी कंपनीने 16 ऑक्टोबरचा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून फिक्स केला आहे. अर्थात या तारखेपर्यंत जा गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. आता आपण कंपनीची शेअर मार्केट मधील कामगिरी कशी राहिली आहे याचा आढावा घेऊयात.
किती रिटर्न मिळालेत
शुक्रवारी शेअर्समध्ये घसरण झाली. पण गेल्या तीन महिन्यात कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 50% रिटर्न दिले आहेत. तसेच सहा महिन्यात या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे 150 टक्क्यांनी वाढलेत.
मागील तीन वर्षांच्या काळात या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 2229 % परतावा दिला आहे. मात्र मागील एका वर्षाचा काळ फारसा फायदेशीर राहिलेला नाही. मागील बारा महिन्यात कंपनीचा स्टॉक फक्त 55 टक्क्यांनी वाढला आहे.