Bonus Share October 2025 : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी बोनस शेअर्स मध्ये तसेच डिव्हीडंड देणाऱ्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अधिक खास ठरणार आहे. सयाजी इंडस्ट्रीज लिमिटेड या 84 वर्षाच्या जुन्या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्स ला बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा केली आहे.
यामुळे या कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या जुन्या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला 3:1 या प्रमाणात नवीन फ्री शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जर तुम्ही ही बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करण्याच्या तयारीत असाल तर ही एक तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते.

सयाजी इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या शेअर होल्डर्स ला एका शेअरवर तीन बोनस शेअर देणार आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा फायनलाईज झाली असेल याची माहिती कंपनीच्या संचालक मंडळाकडून समोर आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक एक्सचेंज ला दिलेल्या माहितीनुसार सात ऑक्टोबर ही बोनस ईश्यूची रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
ही रेकॉर्ड पुढील आठवड्यातच राहणार आहे. खरे तर या जुन्या कंपनीने आत्तापर्यंत आपल्या शेअर होल्डर्स ला बोनस शेअर दिलेले नाहीत. कंपनी पहिल्यांदाच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे. यामुळे या कंपनीची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सयाजी इंडस्ट्रीज लिमिटेडने बोनस शेअर्स साठी 7 ऑक्टोबर 2025 ही तारीख फायनल केले आहे. अर्थात या तारखेपर्यंत ज्या शेअर होल्डर्स कडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना या बोनस इशूचा लाभ मिळणार आहे. कंपनीच्या रेकॉर्ड बुक मध्ये या तारखेपर्यंत ज्या शेअर होल्डरचे नाव असेल त्यांनाच या बोनसचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान कंपनीने बोनसची घोषणा केल्यानंतर शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आलीये. 3 ऑक्टोबरला या कंपनीचे शेअर्स 319 रुपयांवर क्लोज झालेत. या कंपनीचे मार्केट कॅप 201 कोटी रुपये आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या बारा महिन्यांच्या काळात या कंपनीचे स्टॉक 36 टक्क्यांनी वाढले आहेत.
मागील पंधरा दिवसांच्या काळात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 11 टक्क्यांची रिटर्न दिले आहेत. जून 2025 पर्यंत कंपनीमध्ये जवळपास 75 टक्के हिस्सा प्रमोटर्सचा होता. कंपनीचा एकत्रित महसूल एप्रिल-जून 2025 तिमाहीत घसरलाय. तसेच आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीचा स्टॅन्डअलोन रेवेन्यू 957.56 कोटी रुपये होता.
कंपनीबाबत बोलायचं झालं तर सयाजी इंडस्ट्रीज कॉर्न स्टार्च आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह्ज बनवते. ही कंपनी 1941 मध्ये हिंदुस्तान कलर्स अँड केमिकल्स म्हणून स्थापन झाली आणि टेक्स्टाईल रॉ मटेरियल पूरवत होती. पुढे 1941 मध्ये मक्याची ग्राइंडिंग सुरू झाली. या कंपनीच्या शेअरचे फेस व्हॅल्यू पाच रुपये आहे. कंपनीने बोनस शेअरची घोषणा ऑगस्ट महिन्यात केली होती.