‘या’ कंपनीच्या एका शेअरवर मिळणार एक शेअर फ्री ! गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी 

Published on -

Bonus Share : सध्या शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. त्यासोबतच कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स तसेच डेव्हिडंट देण्याची घोषणा सुद्धा केली जात आहे. खरे तर कंपन्या वेळोवेळी आपल्या शेअर होल्डर्सला कॉर्पोरेट लाभाची भेट देत असतात.

बोनस शेअर्स आणि Dividend च्या माध्यमातून कंपनीकडून गुंतवणूकदारांना नफा वाटप केला जातो. दरम्यान जर तुम्हीही बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

शेअर मार्केट मधील आणखी एका छोट्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची मोठी घोषणा केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या कंपनीने गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना 600 टक्के रिटर्न दिले आहे. तसेच गेल्या पाच वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 1400% रिटर्न दिले आहेत.

कोणता आहे तो स्टॉक ? 

प्रो फिन कॅपिटल सर्विसेस लिमिटेड या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. यामुळे कंपनीच्या स्टॉक मध्ये पुन्हा एकदा तुफान तेजी आली आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर देणार आहे.

म्हणजे ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचा एक स्टॉक आहे त्यांना आणखी एक स्टॉक बोनस मिळणार आहे. Pro Fin Capital Services Ltd च्या संचालक मंडळाने 10 ऑक्टोबरला बोनस शेअर देण्याची घोषणा केली. त्याचा परिणाम म्हणून हा स्टॉक फोकस मध्ये आला आहे.

13 ऑक्टोबर रोजी या स्टॉक मध्ये 1.24 टक्क्यांची वाढ झाली. सध्या हा स्टॉक 11.45 रुपयांवर व्यवहार करतोय. दरम्यान कंपनीने अजून बोनस शेअर्स साठीची रेकॉर्ड डेट निश्चित केलेली नाही. तरीही या शेअर्सच्या खरेदीमध्ये वाढ झाली आहे.

बोनस शेअर्सच्या घोषणेनंतर कंपनीचे स्टॉक तेजीत आले आहेत. मात्र प्रमोटर्सच्या शेअर होल्डिंग मध्ये थोडीशी किरकोळ घट झालेली आहे. तसेच त्यांच्याकडील 30.15% शेअर्स तारण ठेवलेले आहेत.

नक्कीच ही बाब काय गुंतवणूकदारांसाठी जोखिमेची वाटणार आहे. यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील जोखीम आणि कंपनीचे सर्व फंडामेंटल्स चेक करणे गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News