शेअर मार्केटमधील ‘ही’ कंपनी तिसऱ्यांदा देणार मोफत शेअर्स ! रेकॉर्ड तारीख झाली फिक्स

Published on -

Bonus Share : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी तिसऱ्यांदा बोनस शेअरची घोषणा केली आहे.

खरंतर शेअर मार्केट मधील अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असतात.

तुम्ही पण अशीच तयारी करत असाल तर तुमच्यासाठी मार्केटमधील एका कंपनीकडून एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

जोंजुआ ओव्हरसीजने बोनस शेअर्स वितरणाची मोठी घोषणा केली असून या कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत.

या कंपनीने 5:40 च्या प्रमाणात बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला असून याची रेकॉर्ड तारीख सुद्धा फिक्स झाली आहे. अशा स्थितीत आज आपण या निर्णयाची सविस्तर माहिती येथे जाणून घेणार आहोत.

काय आहे रेकॉर्ड तारीख

जोंजुआ ओव्हरसीज आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येकी 40 शेअर्सवर पाच शेअर्स मोफत देणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय कंपनीने घेतलेला आहे. यासाठी 23 जानेवारी 2026 ही रेकॉर्ड तारीख फायनल करण्यात आली आहे.

शेअर मार्केट मधील कामगिरी

या कंपनीच्या शेअर्समधील कामगिरी सध्या निराशाजनक आहे. 14 जानेवारी रोजी याचे शेअर 5.57 रुपयांवर व्यवहार करत होते. मागील सहा महिन्यांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सतत घसरण होत आहे.

गेल्या पाच दिवसात कंपनीचे शेअर्स वीस टक्क्यांनी घसरलेत. मागील 30 दिवसात या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना 31 टक्के इतके निगेटिव्ह रिटर्न मिळाले आहेत.

तसेच गेल्या सहा महिन्यात गुंतवणूकदारांना 51% इतके निगेटिव्ह रिटर्न मिळाले आहेत. कंपनीने मागील वर्षी जुलै महिन्यात प्रत्येक वीस शेअर्स मागे एक बोनस शेअर दिला होता.

2023 मध्ये कंपनीने प्रत्येकी 50 शेअर्स मागे 9 शेअर्स मोफत दिले होते. आता पुन्हा एकदा कंपनीकडून बोनस शेअरची घोषणा करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News