3 वेळा बोनस शेअर देणाऱ्या या कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल ! एक लाखाचे झालेत एक कोटी

Published on -

Bonus Share : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. कारण म्हणजे बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत.

पण बाजारातील या चढउताराचा देखील काही शेअर्सवर कुठलाच फरक पडलेला नाही. काही कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतायेत. नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सुद्धा अशीच एक मल्टीबॅगर कंपनी आहे.

या कंपनीच्या स्टॉकने गेल्या 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवल आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्सनी गेल्या 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे एक लाख रुपयांचे एक कोटी रुपये बनवले आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दहा वर्षात तीन वेळा बोनस शेअर सुद्धा दिलेले आहेत. यामुळे या कंपनीचे स्टॉक गुंतवणूकदारांमध्ये नेहमी चर्चेचा विषय राहतात.

10 वर्षात गुंतवणूकदार बनलेत करोडपती 

जुलै 2015 मध्ये नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) चे शेअर्स चाळीस रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत होते. अशा स्थितीत जर 2015 मध्ये एखाद्या व्यक्तीने या कंपनीचे एक लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते आणि ही गुंतवणूक आत्तापर्यंत ओल्ड करून ठेवली असती तर त्या शेअरची किंमत आज एक कोटी रुपये झाली असती.

त्यावेळी या कंपनीचे एक लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते तर एकूण 2480 शेअर मिळाले असते. दरम्यान गेल्या दहा वर्षांच्या काळात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एकूण तीन वेळा बोनस शेअर दिले आहेत.

सोबत शेअरचे मूल्यही वाढले आहे. अशा परिस्थितीत त्या एक लाख रुपयांच्या 2480 शेअर्सची संख्या आता 24,552 झाली असेल. काल या स्टॉक ची किंमत 417.60 रुपये होती. यानुसार या शेअर्सचे एकूण मूल्य 1.02 कोटी रुपये होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News