Bonus Share : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी नवीन वर्ष सुरू होण्याआधीच एक महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. शेअर मार्केट मधील एका बड्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोफत शेअर्स वितरित करण्याची घोषणा केली आहे.
खरंतर अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत. अनेक जण नव्या वर्षात अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत आणि तुम्ही पण अशीच प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

सीडब्ल्यूडी लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स देण्याची मोठी घोषणा केली आहे. अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवून असतात. साहजिकच ही घोषणा अशा गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान या कंपनीने बोनस शेअर्स साठीची रेकॉर्ड सुद्धा फायनल केली आहे. आता आपण या कंपनीच्या बोनस शेअर्स संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती बोनस शेअर्स मिळणार?
कंपनीनं संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 1 शेअरवर 4 बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांकडे रेकॉर्ड तारखेला एक शेअर्स असेल त्यांना चार मोफत शेअर्स मिळणार आहेत.
महत्वाची बाब म्हणजे कंपनीने यासाठीची रेकॉर्ड सुद्धा निश्चित केली आहे. 2 जानेवारी 2026 ही यासाठीची रेकॉर्ड तारीख राहणार आहे.
म्हणजे 1 जानेवारी 2026 अखेर ज्या लोकांकडे या कंपनीचे शेअर्स असतील त्यांना या बोनस शेअर्स चा लाभ मिळणार आहे. आता तुम्हाला पण याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक जानेवारीपर्यंत कंपनीचे शेअर्स खरेदी करावे लागणार आहेत.
एका वर्षात पैसे झाले दुप्पट
या कंपनीच्या शेअर मार्केटमधील कामगिरी बाबत बोलायचं झालं तर मागील बारा महिन्यांच्या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. अर्थात या शेअर्सने गेल्या बारा महिन्यांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांची रक्कम दुप्पट केली आहे.
पण शुक्रवारी या शेअर्सच्या किमतीत तीन – चार टक्क्यांची घट झाली आहे. सध्या या कंपनीचा स्टॉक 1831 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय. मागील बारा महिन्यांमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना 131% रिटर्न दिले आहेत. मात्र तीन महिन्यात शेवटच्या किमती फक्त दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत.