Bonus Share : तुम्हालाही बोनस शेअर मध्ये गुंतवणूक करायची आहे का मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेअर मार्केटमध्ये लिस्टेड एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली आहे.
खरे तर गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्यांच्या माध्यमातून सप्टेंबर तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स, डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट यांसारख्या मोठमोठ्या घोषणा सुद्धा केल्या जात आहेत.

अशातच आता ऑटोरायडर्स इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स वाटपाची घोषणा केली आहे.
याआधी कंपनीने आठ वर्षांपूर्वी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरची भेट दिली होती आणि आता आठ वर्षानंतर कंपनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना खुश करण्यासाठी बोनस शेअरचे वाटप करणार आहे.
यामुळे कंपनीच्या या बोनस शेअरची घोषणा सध्या चर्चेत आहे. बऱ्याच वर्षानंतर कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार असल्याने या घोषणाची चर्चा होणे स्वाभाविक आहे.
दरम्यान बोनस शेअर्स जाहीर झाल्यानंतर कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. विशेष म्हणजे याची रेकॉर्ड डेट पण फायनल झाली आहे.
किती शेअर्स बोनस मिळणार?
Autoriders International LTD ने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी पात्र गुंतवणूकदारांना 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या प्रत्येक 1 शेअरसाठी 5 बोनस शेअर्स देणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कंपनीने 2017 मध्ये याआधी बोनस शेअर्स दिले होते. त्यावेळी पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 1 शेअरसाठी एक शेअर बोनस देण्यात आला होता.
आता ऑटोरायडर्स इंटरनॅशनल लिमिटेडने शेअर बाजाराला माहिती दिली आहे की संचालक मंडळाच्या बैठकीत 5 बोनस शेअर्ससाठी 18 नोव्हेंबर ही रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित करण्यात आली आहे.
याचा अर्थ असा की या तारखेला ज्या लोकांकडे कंपनीचे शेअर्स असतील ते गुंतवणूकदार बोनस शेअर्ससाठी पात्र ठरणार आहेत. या शेअर्सने गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांहून अधिक परतावा सुद्धा दिला आहे.
आता ही कंपनी पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 1 शेअरसाठी 5 Bonus Shares देणार म्हणून याची चर्चा आहे. 10 नोव्हेंबरला कंपनीने हा निर्णय घेतलाय.











