Bonus Shares:- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण आपल्याला दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. या ठिकाणी गुंतवणुकीत जोखीम असली तरी देखील विविध मार्गाने गुंतवणूकदार या माध्यमातून गुंतवणूक केल्यास पैसे मिळवू शकतात. जसे की बऱ्याच कंपन्या आपल्या भागधारकांना अंतिम लाभांश आणि बोनस शेअर्स जारी करतात व त्यामुळे अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा मार्ग भागधारकांना उपलब्ध होतो. अगदी याच प्रकारे आपण बघितले की सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्याच कंपन्यांनी गुंतवणूकदारांसाठी अंतिम लाभांश आणि बोनस शेअर्स जारी केलेले आहेत व त्याच प्रकारे आता संदूर मॅग्नीज या कंपनीने देखील आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केलेली आहे.
संदूर मॅग्नीज भागधारकांना देणार बोनस शेअर्स
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संदुर मॅग्नीज या कंपनीने भागधारकांसाठी बोनस शेअर्स देण्याचे जाहीर केले आहे व विशेष म्हणजे दुसऱ्या वर्षी कंपनीने बोनस शेअर्स जारी केलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी एका शेअरवर दोन शेअर्स बोनस देत असून त्यासाठीची रेकॉर्ड डेट कंपनीने जाहीर केलेली आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्ममध्ये चांगले रिटर्न देखील दिले आहेत.

रेकॉर्ड डेट काय?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संदूर मॅग्नीज या कंपनीने शेअर बाजारांना महत्त्वाची माहिती दिली व त्यामध्ये त्यांनी सांगितले की, दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर कंपनी दोन बोनस शेअर्स देणार असून याकरिता कंपनीने 23 सप्टेंबर 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. विशेष म्हणजे या कंपनीने मागच्या वर्षी देखील फेब्रुवारी महिन्यात एक बोनस शेअर्सचा व्यवहार केला होता. त्यानंतर कंपनीने एका शेअरवर पाच शेअर्स बोनस दिला होता. या महिन्याच्या दहा तारखेला कंपनीच्या शेअरचा एक्स- डिव्हिडंड ट्रेडिंग करण्यात आला होता व त्यानंतर कंपनीने एका शेअरवर साधारणपणे 1.25 रुपये लाभांश दिला होता. इतकेच नाहीतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात देखील कंपनीने एक रुपया प्रति शेअर याप्रमाणे गुंतवणूकदारांना लाभांश दिला होता.
या कंपनीचा शेअर्सचा परफॉर्मन्स कसा?
शुक्रवारी या कंपनीचा शेअर्समध्ये पाच रुपयांनी वाढ झाली व 477.60 रुपयांवर बंद झाला. गेल्या एक महिन्यामध्ये या शेअरच्या किंमतींमध्ये चार टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली व साधारणपणे या वर्षात म्हणजेच 2025 मध्ये कंपनीच्या शेअरच्या किमतीत 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र एक वर्षाच्या कालावधीत या शेअर्समध्ये 1.29 टक्क्यांची घसरण झाली आहे.