7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला. त्यानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 53% झाला आहे.
महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी निर्गमित केला असून आता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 53% करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, केंद्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% झाल्यानंतर इतर भत्त्यांमध्येही वाढ करण्याबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाल्यानंतर सरकारने इतर अनेक भत्तेही वाढवले. त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाली. आता महागाई भत्ता ५३ टक्के झाल्यानंतर सरकार मागच्या वेळेप्रमाणे इतर भत्तेही वाढवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता आपण याच संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महागाई भत्ता समवेत इतरही भत्ते वाढणार का?
खरं तर, 7 व्या वेतन आयोगाने शिफारस केली आहे की जेव्हा महागाई भत्ता 50% पेक्षा जास्त असेल तेव्हा घरभाडे भत्त्यासह काही इतर भत्ते जसे की, HRA सारखे भत्ते देखील वाढवावेत. याअंतर्गत महागाई भत्ता 50% झाल्यानंतर शासनाच्या विविध विभागांनी इतर भत्त्यांमध्ये वाढ केली होती. यामध्ये एचआरए, विशेष भत्ता, शिक्षण भत्ता यांसारख्या भत्त्यांचा समावेश आहे.
आता महागाई भत्ता 53% झाल्यानंतर एचआरएसह इतर भत्त्यांमध्येही वाढ होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यावेळी इतर भत्त्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सोप्या शब्दात, HRA सारख्या भत्त्यांमध्ये कोणतीही सुधारणा सरकारच्या कोणत्याही अधिकृत अधिसूचनेशिवाय किंवा धोरणाशिवाय लागू होत नाही, जरी DA 53% पर्यंत पोहोचला तरी. याचाच अर्थ महागाई भत्ता 53% झाला म्हणजेच आपोआप इतर भत्ते वाढणार नाहीत. यासाठी सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता या संदर्भात सरकार काय निर्णय घेणार हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.