भाऊ जास्त नाही फक्त 100 रुपयांची एसआयपीतील गुंतवणूक देखील तुम्हाला बनवेल लखपती! फक्त फॉलो करा ‘हे’ नियम

Published on -

Tips For Invest In SIP:- म्युच्युअल फंड एसआयपी हा अलीकडच्या कालावधीतील गुंतवणुकीचा सर्वात प्रसिद्ध होत असलेला पर्याय असून यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा ट्रेंड वाढताना दिसून येत आहे. एसआयपीच्या माध्यमातून जास्तीत जास्त बारा टक्क्यांचा परतावा हा मिळतो असे म्हटले जाते.

त्यामुळे तुम्ही जर म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये खंड न पडू देता आणि सातत्याने गुंतवणूक करत राहिला तर दीर्घ कालावधीमध्ये तुम्ही लाखो ते कोटी रुपये या माध्यमातून जमा करू शकतात. तसेच एसआयपीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चक्रवाढीचा फायदा देखील मिळतो.

तसे पाहायला गेले तर म्युच्युअल फंड एसआयपी हा शेअर मार्केटवर आधारित प्रकार असल्याने त्यामध्ये जोखीम असते. परंतु तरीदेखील मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्याचा ट्रेंड वाढत आहे. तुम्ही अगदी शंभर रुपये दरमहा गुंतवून देखील श्रीमंत होऊ शकतात. परंतु याकरिता तुम्हाला काही टिप्स फॉलो करणे खूप गरजेचे राहते. तरच हे शक्य होते.

या पाच टिप्स फॉलो केल्या तर होईल फायदा

1- लवकरात लवकर पैसे गुंतवायला सुरुवात करावी- तुम्हाला जर एसआयपी मध्ये गुंतवणूक करून चांगला पैसा मिळवायचा असेल तर यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही लवकरात लवकर एसआयपी सुरू करणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही जितक्या कमी वयापासून एसआयपी करायला सुरुवात कराल तितक्या लवकर या माध्यमातून लखपती किंवा कोट्याधीश होऊ शकतात.

2- जास्त कालावधी करिता गुंतवणूक करावी- एसआयपीच्या माध्यमातून जर तुम्हाला मोठा फंड जमा करायचा असेल तर तुम्ही शक्य तितक्या काळासाठी एसआयपी सुरू ठेवावी. म्हणजे तुम्ही जितका जास्तीत जास्त कालावधी करिता गुंतवणूक करणे सुरू ठेवाल तितका तुम्हाला चक्रवाढीचा फायदा होईल व त्यामुळे तुमचे गुंतवलेले पैसे वेगात आणि जलद गतीने वाढतील.

3- एसआयपीत खंड पडू देऊ नये- एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना आर्थिक शिस्त पाळणे खूप गरजेचे आहे. एकदा का तुम्ही यामध्ये गुंतवणूक सुरू केली तर ती नियमितपणे करणे गरजेचे आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये यात खंड पडायला नको. तुम्ही जर यामध्ये अधून मधून खंड पाडला तर त्याचा विपरीत परिणाम तुम्हाला मिळणाऱ्या एकूण परताव्यावर होतो.

4- स्टेप अपचा फायदा घ्यावा- समजा तुम्ही एसआयपी सुरू केली व कालांतराने तुमचे मिळणारे उत्पन्न वाढायला लागले तर तुम्ही एसआयपीमध्ये जी काही रक्कम गुंतवत आहात त्या रकमेमध्ये वाढ करत जावी व यामुळे तुमची गुंतवणूक वाढते व तुम्हाला मिळणारा परतावा व चक्रवाढीचा जास्तीचा फायदा मिळतो. यालाच स्टेप अप म्हणून देखील ओळखले जाते.

5- गरज आणि जोखीम नुसार योजनेची निवड करणे- तुम्हाला जर म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही सहन करू शकाल तेवढी जोखीम घ्यावी. त्यामध्ये लार्ज कॅप फंड हे साधारणपणे स्मॉल आणि मिड कॅप फंडांपेक्षा गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानले जातात. त्यामुळे या अनुषंगाने तुम्हाला जर म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे गरजेचे आहे व त्यानुसार गुंतवणुकीची प्लॅनिंग करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe