Brokerage Tips For Investment:- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीत आयकर सवलत मर्यादा 7 लाख रुपयांवरून 12 लाख रुपये केली आहे. यामुळे मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे क्रयशक्तीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि भांडवली बाजारालाही याचा फायदा होऊ शकतो.
FMCG आणि लहान वस्तू कंपन्यांना लाभ
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष रामदेव अग्रवाल यांच्या मते FMCG (फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स) क्षेत्र आणि Zomato सारख्या लहान वस्तूंशी संबंधित कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. कारण कर कमी केल्यामुळे नागरिकांच्या खर्चात वाढ होईल. ज्यामुळे कंझ्युमर सेक्टरला प्रोत्साहन
भांडवली बाजारात गुंतवणूक करण्याची संधी
अग्रवाल यांच्या मते 25 लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींच्या गरजा आधीच पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्न खर्च करण्याची आवश्यकता नाही. यामुळे ते कर बचतीतून मिळालेल्या पैशांचा मोठा भाग भांडवली बाजारात गुंतवू शकतात. यामुळे भांडवली बाजारातील व्यवहारांमध्ये वाढ होईल.
डिजिटल आणि क्विक कॉमर्स कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी
रामदेव अग्रवाल यांनी डिजिटल आणि क्विक कॉमर्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांचा विश्वास आहे की,या कंपन्यांचा वाढीचा दर पारंपरिक कंपन्यांच्या तुलनेत जास्त आहे. डिजिटल आणि क्विक कॉमर्स कंपन्या वेगाने वाढत आहेत आणि यामध्ये 10-15% चा उच्च वाढीचा दर असू शकतो.
डिजिटल कंपन्यांमध्ये गुंतवणूक ठरेल फायद्याची
पारंपरिक कंपन्यांच्या कमाईची वाढ मंद आहे. परंतु त्यांचे मूल्यांकन जास्त आहे. म्हणूनच रामदेव अग्रवाल यांनी डिजिटल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरवण्याचे सांगितले आहे.कारण या कंपन्यांचे मूल्यांकन कमी असले तरी त्यांची वाढीची क्षमता अधिक आहे.
भविष्यकालीन गुंतवणुकीचे धोरण
पुढच्या काळात डिजिटल आणि क्विक कॉमर्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे एक चांगला निर्णय ठरू शकतो. यामुळे गुंतवणूकदारांना उच्च वाढीची संधी मिळेल आणि भांडवली बाजारातील मागणी वाढण्याची शक्यता आहे.