Business Idea : मस्तच! प्रत्येक महिन्याला होईल 10 लाखांची कमाई, आजच सुरू करा ‘हा’ व्यवसाय

Ahmednagarlive24 office
Published:
Business Idea

Business Idea : सध्या असे अनेक व्यवसाय आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आता लाखो रुपयांची कमाई करता येईल. समजा तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. आता तुम्ही सरकारी मदत घेऊन तुमचा व्यवसाय सुरु करू शकता.

तुम्ही अमूल आउटलेटची फ्रँचायझी घेतल्यास तर त्यासाठी तुमच्याकडे 150 स्क्वेअर फूट जागा असावी. पुरेशी जागा असेल तर अमूल तुम्हाला फ्रँचायझी देईल. अमूल आइस्क्रीम पार्लरच्या फ्रँचायझीसाठी कमीत कमी 300 चौरस फूट जागा असावी. समजा तुमच्याकडे जागा नसेल तर अमूल फ्रँचायझी देणार नाही.

किती येईल खर्च?

तुम्हाला अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर चालवायचे असल्यास त्याच्या फ्रँचायझीची योजना बनवायची असेल, तर तुम्हाला त्यात जास्त गुंतवणूक करावी लागणार आहे. हे खरेदी करण्यासाठी तुम्हाला 5 लाख रुपये गुंतवावे लागणार आहेत. यात तुम्हाला ब्रँड सिक्युरिटी म्हणून 50 हजार रुपये, नूतनीकरणासाठी 4 लाख रुपये, उपकरणे 1.50 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.

अमूल आपला व्यवसाय वाढवण्यासाठी दोन प्रकारच्या फ्रँचायझी देत ​​असून तुम्हाला अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्कची फ्रँचायझी घ्यायची असल्यास तुम्हाला त्यात सुमारे 2 लाख रुपये गुंतवावे लागणार आहेत. यात 25 हजार रुपये नॉन-रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी, 1 लाख रुपये नूतनीकरणासाठी, 75 हजार रुपये उपकरणांवर खर्च येतो. तुम्ही अधिक माहितीसाठी, कंपनीच्या वेबसाइट किंवा फ्रेंचायझी पृष्ठास भेट देऊ शकता.

व्यवसाय करणे खूप सोपे आहे. अमूलचा प्रत्येक शहरात चांगला ग्राहकवर्ग असून प्रत्येक शहरात लोक त्याची उत्पादने नावाने ओळखतात. मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांत तो पोहोचला आहे. त्यामुळे अमूल फ्रँचायझी घेत असल्याने तुमचे कोणतेही नुकसान होत नाही.

फ्रँचायझीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एकूण 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होते. समजा तुम्ही अमूल आउटलेटचा लाभ घेतला तर कंपनी अमूल उत्पादनांच्या कमीत कमी विक्री किंमतीवर म्हणजेच मूळ किमतीवर कमिशन देते.

यात दुधाच्या पाऊचवर 2.5 टक्के कमिशन, दुग्धजन्य पदार्थांवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन असते. अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी घेतली तर तुम्हाला रेसिपीवर आधारित आइस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन मिळेल. कंपनी प्री-पॅक केलेल्या आइस्क्रीमवर 20 टक्के कमिशन आणि अमूल उत्पादनांवर 10 टक्के कमिशन मिळते, हे लक्षात घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe