Business Idea : अवघ्या 10,000 रुपयांमध्ये सुरु करा हा व्यवसाय ! थोड्याच दिवसांत कमवाल लाखो….

Ahmednagarlive24 office
Published:
Business Idea

Business Idea : देशात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तसेच अनेक तरुण-तरुणी बेरोजगार आहेत. अनेकजण सध्या नोकरी न करता व्यवसायाकडे वळत आहेत.

मात्र महागाई वाढल्याने अनेकांना मोठमोठे व्यवसाय करणे देखील शक्य नाही. पण तुम्हाला कमी बजेटमध्ये शानदार व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी एक भन्नाट व्यवसाय आहे जो तुम्ही अवघ्या 10,000 रुपयांमध्ये सुरु करू शकता.

तुमचे व्यवसाय करण्याचे स्वप्न आता अगदी कमी पैशात पूर्ण होईल. घरबसल्या तुम्ही लोणचे बनवण्याचा व्यवसाय करू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला जास्त भांडवलाची गरज नाही. तुम्ही कमी पैशात हा व्यवसाय सुरु करू शकता.

तुम्ही लोणचे बनवण्याचा छोटा व्यवसाय सुरु केल्यानंतर तुमचा हा व्यवसाय हळूहळू मोठ्या व्यवसायात रूपांतर होईल. तुमच्याकडे जसजसे व्यवसायातून आर्थिक भांडवल येईल तसतसे तुम्ही हा व्यवसाय मोठा करू शकता.

फक्त 10,000 रुपयांपासून व्यवसाय सुरू करा

लोणचे बनवण्याचा व्यवसाय हा सहा महिने करून तो तुम्ही वर्षभर आरामात चालवू शकता. सुरुवातीला तुम्हाला या व्यवसायात 10,000 रुपये गुंतवावे लागतील. या व्यवसायातून तुम्ही दरमहा किमान 30,000-35,000 रुपये आणि वार्षिक लाखो रुपये सहज कमवू शकता.

तुम्ही लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरु केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम ऑनलाइन, घाऊक बाजार, किरकोळ बाजारातील खरेदीदार शोधावे लागतील. व्यवसायाचे मार्केटिंग करणे सर्वात महत्वाचे आहे.

केंद्र सरकारकडून व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. कमी जागेत लोणचे बनवण्याचा व्यवसाय तुम्ही अगदी सहज करू शकता. लोणचे कमी दिवसांत खराब होऊ नये यासाठी ते स्वच्छ पद्धतीने बनवले जाते.

व्यवसायाची व्यापकता वाढवण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तो व्यवसाय कसा वाढेल याचा विचार करावा लागेल. व्यवसाय छोटा असला तरी त्याचे मार्केटिंग योग्य होणे अपेक्षित आहे. तेव्हाच तुम्ही व्यवसायात यशस्वी व्हाल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe