सोमवारपर्यंत 1 शेअर्स घ्या आणि मिळवा 4 बोनस शेअर्स! बघा ‘या’ कंपनीचा धमाका

Published on -

Bajaj Finance Bonus Share:- शेअर बाजारात आज एक महत्त्वाची हालचाल सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली व ती म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेड या प्रसिद्ध आर्थिक सेवा कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स आणि शेअर स्प्लिटसारखा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या आठवड्यात या स्टॉककडे अनेकांची नजर लागलेली असणार हे नक्की.

बजाज फायनान्सने काय केले जाहीर?

बजाज फायनान्सने जाहीर केलं आहे की कंपनीचे शेअर्स दोन भागांमध्ये विभागले जाणार आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक शेअरवर चार बोनस शेअर्स दिले जाणार आहेत. हे दोन्ही बदल सोमवारी, म्हणजे १६ जून २०२५ रोजी प्रत्यक्षात येणार आहेत. त्यासाठी ही रेकॉर्ड डेट ठरवण्यात आली आहे. म्हणजेच, ज्यांच्याकडे या दिवशी कंपनीचे शेअर्स असतील, त्यांनाच या दोन्ही सुविधांचा लाभ मिळणार आहे.

सध्या बजाज फायनान्सचा एक शेअर जवळपास ९३०० रुपये दरम्यान व्यवहार करत आहे. शुक्रवारच्या शेवटच्या सत्रात हा शेअर बीएसईवर थोडा घसरून ९३३४.१५ रुपयांवर बंद झाला. पण हा किरकोळ घसरणीचा मुद्दा बाजूला ठेवला, तरी कंपनीच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाला आहे.

बजाज फायनान्सने काय दिली माहिती?

कंपनीने सांगितल्यानुसार, शेअर्सचा स्प्लिट झाल्यानंतर प्रत्येक शेअरचं दर्शनी मूल्य (Face Value) १० रुपयांवरून थेट १ रुपयांपर्यंत खाली येणार आहे. त्याचवेळी, नवीन स्वरूपात मिळणाऱ्या प्रत्येक शेअरवर गुंतवणूकदारांना चार अतिरिक्त बोनस शेअर्स मिळतील. त्यामुळे तुमच्याकडे जर एखादा शेअर असेल, तर शेअर स्प्लिटनंतर तो दोन होईल आणि त्यावर बोनस म्हणून आणखी चार म्हणजे शेवटी तुमच्याकडे एकाऐवजी सहा शेअर्स होतील.

ही पहिली वेळ नाहीये की कंपनी बोनस शेअर्स देत आहे. याआधी २०१६ मध्येही बजाज फायनान्सने एक्स-बोनस ट्रेड केला होता आणि त्यावेळी एका शेअरमागे एक शेअर मोफत देण्यात आला होता. एवढंच नव्हे, तर याच वर्षी ३० मे रोजी कंपनीने एक्स-डिव्हिडंड ट्रेड केला आणि पात्र गुंतवणूकदारांना ४४ रुपये प्रतिशेअर लाभांशही दिला होता.

गेल्या वर्षभरातील बजाज फायनान्सच्या शेअरची स्थिती

गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरच्या किमतीत सुमारे २८ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ९७८५.९० रुपये इतका असून नीचांक ६४२६.०५ रुपये आहे. म्हणजेच, बजाज फायनान्सचा प्रवास बघता कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना वेळोवेळी चांगला परतावा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News