Dhanteras 2023 : या शुभ मुहूर्तावर करा सोन्याची खरेदी, होईल फायदा..

Ahmednagarlive24 office
Published:

Dhanteras 2023 : धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरसने दिवाळीची सुरुवात होते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र सोन्याची खरेदी केली जाते. कारण या मुहूर्तावर सोने खरेदी करेन शुभ मानले जाते. मात्र दिवाळीच्या नेमक्या कोणत्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ राहील. जाणून घ्या सविस्तर.

दरम्यान, दिवाळी निमित्त घरासाठी नवीन वस्तू खरेदी करणे हे खूप शुभ मानले जाते. कारण दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला घरासाठी शुभ वस्तू खरेदी करण्याचीही आपली परंपरा आहे. दरम्यान, पैश्या व्यतिरिक्त, पिवळ्या धातूला खूप सांस्कृतिक महत्त्व आहे. यामुळे धनत्रयोदशीच्या वेळी लोक सोने खरेदी करतात. असे मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्यास आपल्या घरात समृद्धी आणि संपत्तीची भरभराट होते. दरम्यान, आपल्यासाठी एक उत्तम गुंतवणुकीचा पर्याय ही ठरते.

धनत्रयोदशी व्यक्तीच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी आणण्याचे साधन आहे. धनत्रयोदशीला शुभ मुहूर्तावर सोने खरेदी केल्याने आणखी फायदे होतात. दरम्यान, या धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 वाजता सुरू होणार असून 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:57 पर्यंत असणार आहे. दरम्यान या मुहूर्तावर कधीही खरेदी करू शकता. असे मानले जाते की या शुभ काळात खरेदी केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे घरात समृद्धी येते.

दरम्यान, जर तुम्ही 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशीला सोन्याचे नाणे किंवा दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यासाठी शुभ मुहूर्त दुपारी 12:35 पासून सुरु होणार असून, जे लोक 11 नोव्हेंबरला सोने खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांनी दुपारी 1:57 पर्यंत सोन्याची खरेदी करावी.

जर तुम्हीसुद्धा या दिवाळीला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, वरील दिलेल्या शुभ मुहूर्तावर सोन्याचं खरेदी करणे फायद्याचे राहते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe