New Financial Rule:- आपल्याला माहित आहे की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारच्या माध्यमातून काही आर्थिक बाबतीतल्या नियमात बदल केले जातात व या बदललेल्या नियमांचा सरळ परिणाम हा आर्थिक दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीवर होत असतो. आज 31 ऑगस्ट 2025 म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस असून उद्या सप्टेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे व या सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेपासून प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या व पैशांची निगडित असलेल्या अनेक गोष्टींच्या संबंधित नियमात बदल केला जाणार आहे. हे बदल प्रत्येकाला माहीत असणे तितकेच गरजेचे आहे. कारण या बदलांचा सरळ परिणाम आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यावर होणार असल्याने त्यांची माहिती असणे खूप गरजेचे आहे. चला तर मग या लेखात आपण या संबंधीचीच माहिती अगदी थोडक्यात बघू.
1 सप्टेंबर 2025 पासून होणारे बदल
1- चांदी खरेदीच्या बाबतीतला बदल- उद्यापासून सरकारच्या माध्यमातून चांदीच्या बाबतीत एक नवीन नियम आणला जात असून त्या अंतर्गत आता चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग असणार आहे. याचा अर्थ चांदीच्या किमती आणि गुणवत्तेबाबत आता महत्वाचे नियम लागू केले जाण्याची शक्यता असून यामुळे आता ग्राहकांची चांदीच्या खरेदीमध्ये होऊ शकणारी फसवणूक टाळता येणार आहे व चांदीच्या खरेदीत अधिक विश्वासाहार्य वातावरण तयार होणार आहे.

2- एसबीआय कार्डमध्ये होणारे बदल- समजा तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर आता यामध्ये देखील उद्यापासून काही नियम बदलले जाणार आहेत. यामध्ये बिल पेमेंट, इंधनाची खरेदी किंवा क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन शॉपिंग वर जास्तीचे शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. ऑटो डेबिट जर फेल झाले तर त्यावर दोन टक्क्यांचा दंड आकारला जाईल आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर आता जास्तीचे शुल्क देखील भरावे लागू शकणार आहे. तसेच क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या रिवार्ड पॉईंटचे मूल्य देखील कमी केले जाऊ शकते.
3- एलपीजी सिलेंडरची किंमत- आपल्याला माहित आहे की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल केला जातो. त्यामुळे उद्या एक सप्टेंबर पासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो. जर यामध्ये किमतीत वाढ केली तर नक्कीच याचा फटका ग्राहकांना बसू शकतो आणि किंमत कमी केली गेली तर हा एक मोठा दिलासा ठरणार आहे.
4- एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल- आपल्याला माहित आहे की बरेच व्यक्ती रोख पैशांकरिता एटीएमचा वापर करतात. परंतु एक सप्टेंबर पासून एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल होण्याची शक्यता आहे. एटीएम मधून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर जे शुल्क आकारले जाते त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. यामध्ये निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जर तुम्ही जास्तीचे पैसे काढले तर तुम्हाला शुल्क भरावे लागू शकते. त्यामुळे तुम्ही एटीएमचा वापर जास्त प्रमाणात न करता डिजिटल पेमेंटला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
5- मुदत ठेव योजनांच्या व्याजदरात बदल- आपल्यापैकी बरेच व्यक्ती वेगवेगळ्या बँकांच्या मुदत ठेव योजनांमध्ये एफडी करतात. परंतु उद्या एक सप्टेंबर पासून काही बँकांच्या मुदत ठेवींचे व्याजदर बदलण्याची शक्यता आहे. सध्या जर आपण बघितले तर बऱ्याच बँकांच्या माध्यमातून 6.5% ते 7.5% पर्यंत व्याज देण्यात येत आहे. परंतु एक अंदाज आहे की उद्यापासून या व्याजदरात काही प्रमाणात घट केली जाऊ शकते.