Car Loan EMI:- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी 0.25 टक्क्यांनी रेपो रेट कमी करण्याची घोषणा केली. रेपो रेट म्हणजेच बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेण्यासाठी लागणारा व्याजदर. या निर्णयामुळे कर्ज घेणाऱ्यांसाठी फायदेशीर परिस्थिती निर्माण होईल. कारण बँकांकडून कर्ज घेण्याचे व्याज दर कमी होतील.
खासकरून होम लोन, पर्सनल लोन आणि कार लोन घेणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरली आहे. 5 वर्षांनंतर व्याजदर कमी झाल्यामुळे गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जातील मासिक हप्ता (ईएमआय) कमी होईल.त्यामुळे ग्राहकांना कमी पैसे कर्जाच्या महिन्याच्या ईएमआयला द्यावे लागतील.
![car loan](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/zc.jpg)
5 वर्षासाठीच्या 5 लाखाच्या कार लोन वर किती कमी होईल EMI?
उदाहरणार्थ, 5 वर्षांसाठी 5 लाख रुपयांचे कार लोन घेतल्यास जर व्याजदर 9.20% असेल तर तुमचा मासिक हप्ता सुमारे 10428 रुपये असेल. याचा अर्थ तुम्ही 5 वर्षांच्या कालावधीत एकूण 625667रुपये परत कराल.ज्यात 125667 रुपये व्याजाचा भाग असेल. मात्र जर RBI च्या निर्णयानंतर व्याजदरात 0.25% ची कपात झाली आणि नवीन व्याजदर 8.95% झाला.
तर तुमचा ईएमआय 10367 रुपये होईल. म्हणजेच तुमचा मासिक हप्ता 61 रुपये कमी होईल. यामुळे कर्जाच्या कालावधीत एकूण 122023 रुपये व्याज असेल आणि एकूण परत केलेली रक्कम 622023 रुपये होईल. म्हणजेच तुम्हाला संपूर्ण कर्जाच्या कालावधीत 3644 रुपये कमी व्याज द्यावे लागेल.
फ्लोटिंग व्याजदराचा फायदा
हे लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत जे फ्लोटिंग दरावर कर्ज घेत आहेत. त्यांना अधिक फायदा होईल. फ्लोटिंग व्याजदराचा फायदा हा असतो की रेपो रेटमध्ये झालेल्या बदलामुळे तुमच्या कर्जाच्या व्याजदरातही बदल होतो. जर रेपो रेट कमी होत असेल तर तुमचा कर्जाचा व्याजदर देखील कमी होतो.
यामुळे तुमचा मासिक हप्ता आणि एकूण व्याज कमी होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही फ्लोटिंग दरावर कार लोन घेतले असेल तर आरबीआयच्या निर्णयामुळे तुमच्या कर्जाच्या हप्त्यात कमी होणारी रक्कम आणि कमी व्याजाचा फायदा होईल.
तथापि स्थिर (फिक्स्ड) व्याजदर असलेल्या कर्जांच्या बाबतीत या निर्णयाचा प्रभाव फारसा पडणार नाही.कारण फिक्स्ड दरावर कर्ज घेतल्यास व्याजदर कर्जाच्या पूर्ण कालावधीत स्थिर राहतो.
या परिस्थितीत आरबीआयच्या कपातीचा फायदा तुम्हाला मिळणार नाही. तथापि फ्लोटिंग व्याजदर असलेल्या कर्जासाठी ही एक सकारात्मक संधी ठरू शकते. कारण रेपो रेट कमी होण्यामुळे कार कर्जाचे ईएमआय कमी होईल.
म्हणजे आरबीआयच्या निर्णयामुळे कार कर्ज घेणाऱ्यांना फायदेशीर बदल घडू शकतात. विशेषतः फ्लोटिंग दरावर कर्ज घेतल्यास व्याजदराच्या कपातीमुळे मासिक हप्त्यात कमी होणारा खर्च आणि कमी व्याज देण्याची संधी मिळणार आहे.